advertisement

T20 World Cup च्या पहिल्याच मॅचपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! 12 तासाआधी ड्रेसिंग रुममधून आली वाईट बातमी

Last Updated:

Jasprit Bumrah doubtful for opener against USA : जसप्रीत बुमराह आजारी असल्याने अमेरिकेविरुद्धच्या टी-20 वर्ल्ड कप मॅचमध्ये खेळू शकणार नाही. जसप्रीत बुमराहला फणफणून ताप आला होता.

Jasprit Bumrah doubtful for opener against USA
Jasprit Bumrah doubtful for opener against USA
T20 World Cup, India vs USA : क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉरमॅटच्या महाकुंभाला आजपासून सुरूवात होत आहे. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा श्रीगणेशा पाकिस्तानच्या मॅचने झाला आहे. टीम इंडिया आज आपला पहिला सामना युएसएविरुद्ध खेळेल. अशातच वर्ल्ड कप सुरू होण्याआधी टीम इंडियाला पहिला धक्का बसला होता. स्टार ऑलराऊंडर हर्षित राणा दुखापतग्रस्त झाल्याने तो वर्ल्ड कपमधून बाहेर पडलाय. अशातच आता टीम इंडियाला आणखी एक बॅड न्यूज मिळाली आहे.

जसप्रीत बुमराह आजारी

भारतीय क्रिकेट टीमचा मुख्य वेगवान बॉलर जसप्रीत बुमराह आजारी असल्याने अमेरिकेविरुद्धच्या टी-20 वर्ल्ड कप मॅचमध्ये खेळू शकणार नाही. जसप्रीत बुमराहला फणफणून ताप आला होता. भारत आणि अमेरिका यांच्यातील ही महत्त्वाची लढत शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. बुमराहच्या अनुपस्थितीमुळे भारतीय टीमच्या बॉलिंग आक्रमणात मोठा बदल पाहायला मिळणार असून चाहत्यांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. त्याच्या जागी मोहम्मद सिराज याला संधी मिळू शकते.
advertisement

प्लेइंग इलेव्हन कुणाची निवड?

'इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या रिपोर्टनुसार, टीम मॅनेजमेंट बुमराहच्या बाबतीत कोणतीही घाई करण्यास तयार नाही. त्याला पूर्णपणे फिट होण्यासाठी पुरेसा आराम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुमराह उपलब्ध नसल्याने भारताला आता उपलब्ध असलेल्या 13 खेळाडूंतूनच आपली प्लेइंग इलेव्हन निवडावी लागणार आहे. वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच मुख्य खेळाडू बाहेर जाणे चिंतेची बाब आहे.
advertisement

हर्षित राणाला वर्ल्ड कपमधून बाहेर

दरम्यान, हर्षित राणाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात दुखापत झाली होती, ज्यानंतर मेडिकल टीमने त्याला अनफिट घोषित केले. बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, स्कॅन रिपोर्टनुसार राणा या टूर्नामेंटमध्ये खेळू शकणार नाही. त्याच्या जागी आता मोहम्मद सिराज भारतीय पेस अटॅकची धुरा सांभाळताना दिसेल. यामुळे बॉलिंग लाईनअपमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup च्या पहिल्याच मॅचपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! 12 तासाआधी ड्रेसिंग रुममधून आली वाईट बातमी
Next Article
advertisement
पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement