चीनच्या हेनान प्रांतातील ही घटना. झांग आणि वेन नावाचे हे पालक. झांगला 4 मुलं तर वेनला 2 मुलं. या मुलांसाठी बनवण्यात आलेल्या होमवर्क व्हॉट्सअॅप ग्रुपवर या दोघांची ओळख झाली. क्लास ग्रुप संभाषण दरम्यान दोघांनी एकमेकांशी संपर्क साधला आणि हळूहळू त्यांच्यात जवळीक वाढू लागली. शिक्षकांनी दिलेला गृहपाठ आणि मुलांच्या शिक्षणावर लक्ष ठेवण्यासाठी हा चॅट ग्रुप तयार करण्यात आला होता. मात्र तिथं या दोघांचं जुळलं आणि मुलं, घर सोडून दोघंही एकमेकांसोबत पळून गेले.
advertisement
मुलांच्या होमवर्क चॅट ग्रुपमध्ये भेटलेल्या दोन विवाहित व्यक्ती आपापल्या कुटुंबाला सोडून पळून गेल्या आहेत. झांग आणि वेन अशी या दोघांची नावं आहेत.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, झांग म्हणाली की ती तिचा पती तिचा छळ करायचा. ज्यामुळे तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. एकदा, तिच्या पतीने मारहाण केल्यानंतर, झांगने वेनला पळून जाऊन नवीन आयुष्य सुरू करण्यास सुचवलं.
यानंतर घटस्फोट न घेता, वेन झांगसोबत 680 किलोमीटर दूर असलेल्या टियांजिन शहरात गेली, जिथे दोघेही पाच वर्षे एकत्र राहिले. टियांजिनमध्ये एकत्र राहत असताना, झांग प्रेग्नंट झाली. त्यानंतर दोघांनीही आपापल्या पहिल्या जोडीदाराला घटस्फोट दिला. 24 मे रोजी दोघंही हेनान इथं परतले आणि पोलिसांना त्यांच्या नातेसंबंधाची माहिती दिली.
वृत्तानुसार, त्यांच्या मुलाचं जन्म प्रमाणपत्र आणि ओळखपत्रांबाबत कायदेशीर अडचणींमुळे त्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडलं गेलं. न्यायालयाने त्यांना दोन लग्नासाठी दोषी ठरवलं आणि 4 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली, झांगची शिक्षा 6 महिन्यांसाठी स्थगित केली जेणेकरून ती आपल्या मुलाची काळजी घेऊ शकेल.