टोमॅटो सॉसच्या कारखान्यात पोलिसांनी टाकली धाड, कर्मचाऱ्यांचे कृत्य पाहून सगळेच हादरले!
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
गुप्त माहितीच्या आधारे दारुबंदी विभागाच्या पथकाने या कारखान्यावर छापा टाकला. या वेळी बनावट इंग्लिश मद्य निर्मितीचा पर्दाफाश करण्यात आला.
बेरिया : बिहारमध्ये 2016 पासून दारुबंदी कायदा लागू आहे. पण दारूची तस्करी सुरूच आहे. राजधानी पाटण्यामध्ये नुकताच बनावट दारुच्या कारखान्याचा पर्दाफाश झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामकृष्णनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बेरिया येथे टोमॅटो सॉस फॅक्टरीच्या नावानं बनावट दारू तयार करण्याचा धंदा सुरू होता. या ठिकाणी ब्रँडेड कंपनांच्या नावानं बिनदिक्कतपणे बनावट दारू तयार करून बाटलीबंद केली जात होती. ही बनावट दारू तयार करण्यासोबतच तिची विक्रीदेखील सुरू होती.
गुप्त माहितीच्या आधारे दारुबंदी विभागाच्या पथकाने या कारखान्यावर छापा टाकला. या वेळी बनावट इंग्लिश मद्य निर्मितीचा पर्दाफाश करण्यात आला. या कारवाईत सात जणांना अटक करण्यात आली आहे. या ठिकाणी बनावट दारू तयार केली जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे सहायक आयुक्त प्रेम प्रकाश यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कर्मचारी, अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकानं छापा टाकून बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला.
advertisement
या बाबत उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक मनोज कुमार राय यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, या कारवाईत 250 पोत्यांमध्ये विविध ब्रँडच्या 20 हजारांहून अधिक रिकाम्या बाटल्या, ड्रममध्ये ठेवलेले 200 लिटर स्पिरीट सापडले. ब्रँडेड मद्य कंपन्यांचे रॅपर आणि झाकणं देखील जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सात जणांमध्ये नासरीचक दानापूर खगौल येथील अमीर राजा, सालीमपूर येथील गांधी मैदान परिसरातील आकाश कुमार गुप्ता, आलमगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मठ लक्ष्मणपूर कोईरीटोला येथील रहिवासी अनिल कुमार, पल्लवी नगर येथील गायघाट परिसरातील रहिवासी नवीन कुमार, फुलवारी शरीफ लहरी येथील मोहम्मद तन्वीर, नदी पोलीस स्टेशन हद्दीतील फतेहपूर सबळपूर येथील नितीश कुमार, वैशाली महनार येथील शिवा कुमार यांचा समावेश आहे. हे सर्व जण टोमॅटो सॉसच्या कारख्यान्यात बनावट दारू तयार करण्यात सहभागी होते. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
advertisement
दरम्यान बनावट दारू प्यायल्याने लोक मृत्युमुखी पडल्याच्या अनेक घटना या पूर्वी उघडकीस आल्या आहेत. मद्यपान आरोग्यासाठी घातक असतं. त्यात बनावट दारू प्यायल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. उत्पादन शुल्क विभाग बनावट दारू बनवणारे आणि विक्री करणारे अड्डे शोधून त्यावर कारवाई करत असते. पाटणामध्ये देखील अशाच प्रकारची कारवाई करत बनावट दारूनिर्मितीच्या कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
advertisement
Location :
Bihar
First Published :
February 26, 2024 10:30 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
टोमॅटो सॉसच्या कारखान्यात पोलिसांनी टाकली धाड, कर्मचाऱ्यांचे कृत्य पाहून सगळेच हादरले!