advertisement

पती घरात नव्हता, दारूच्या नशेत ते आले अन् विवाहितेला..., बीडमध्ये संपाजनक प्रकार

Last Updated:

Beed News: “आमच्या विरोधात गेलात, तर तुमच्या मुलीला उचलून नेऊ,” अशी धमकी देत त्यांनी दारूच्या नशेत गोंधळ घातला. त्यानंतर..

दारूच्या नशेत आले, विवाहितेचा हात धरला अन्..., ‘त्या’ घटनेनं बीडमध्ये संताप! (Ai Photo)
दारूच्या नशेत आले, विवाहितेचा हात धरला अन्..., ‘त्या’ घटनेनं बीडमध्ये संताप! (Ai Photo)
बीड: गेल्या काही काळात बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. आता केज तालुक्यातील एका गावात संतापजनक प्रकार घडला आहे. विवाहित महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीला अमानुष मारहाण केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, सामाजिक सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून दोन भावांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास राजेश सुनील चंदनशिव व ज्ञानेश्वर सुनील चंदनशिव हे दोघे मद्यधुंद अवस्थेत पीडित महिलेच्या घरासमोर आले. त्यांनी मोठ्याने आरडाओरड करत परिसरात गोंधळ घातला. आवाज ऐकून महिला घराबाहेर आली असता, आरोपी राजेशने दोन दिवसांपूर्वी झालेल्या कथित वादाचा संदर्भ देत शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर त्याने महिलेचा हात धरून ओढत तिचा विनयभंग केला.
advertisement
याच वेळी आरोपींनी पीडित महिलेला आणि तिच्या कुटुंबाला गंभीर परिणामांची धमकी दिली. “आमच्या विरोधात गेलात, तर तुमच्या मुलीला उचलून नेऊ,” अशी भीषण धमकी देत त्यांनी महिलेला मानसिक धक्का दिला. या घटनेनंतर दोन्ही आरोपी गावात जाऊन महिलेच्या पतीचा शोध घेत होते. काही वेळाने एका हॉटेलसमोर महिलेचा पती दिसताच त्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला.
advertisement
आरोपींनी पीडित पतीला लाथा-बुक्क्यांनी तसेच उसाने तोंडावर व कानावर बेदम मारहाण केली. “तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत आरोपींनी भररस्त्यात दहशत माजवली. या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर गावात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार मुरकुटे करत आहेत. आरोपींविरुद्ध विनयभंग, मारहाण, जीवे मारण्याची धमकी आणि दहशत निर्माण केल्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाई सुरू आहे. पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास केला जात असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
पती घरात नव्हता, दारूच्या नशेत ते आले अन् विवाहितेला..., बीडमध्ये संपाजनक प्रकार
Next Article
advertisement
BMC News: मुंबईकरांच्या खिशातून ५५ कोटी कंत्राटदाराला मिळणार? राजकीय निर्णयाचा मोठा भुर्दंड!
मुंबईकरांच्या खिशातून ५५ कोटी कंत्राटदाराला मिळणार? राजकीय निर्णयाचा मोठा भुर्दं
  • महापालिकेची तिजोरी रिकामी होत असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू असताना

  • आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

  • पार्किंग कंत्राटदाराने मुंबई महापालिकेकडे तब्बल ५५ कोटींच्या नुकसान भरपाईची माग

View All
advertisement