नागपुरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, OYO रुममध्ये 4 तरुणींसोबत सुरू होतं नको ते कृत्य
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Nagpur: नागपूरच्या गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका OYO हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी नागपूर: नागपूरच्या गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी येथील एका OYO हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. इथं चार तरुणींकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर चार तरुणींची सुटका केली आहे. अद्याप दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ओयो हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने संबंधित ओयो हॉटेलवर छापेमारी केली. यावेळी येथील रुममध्ये चार तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचं समोर आलं.
ही छापेमारी केल्यानंतर वेश्याव्यवसायात गुंतलेले चार आरोपी हॉटेलमधून पळून जात होते. यातील दोघांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. तर दोन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. दोघांच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना करण्यात आली आहेत. चेतन चकोले आणि युगांत दुर्गे अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहे. आणखी दोन आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
advertisement
पोलिसांनी ओयो हॉटेलमध्ये धाड टाकून ही संपूर्ण कारवाई केली. यात चार पीडित तरुणींकडून काहीजण वेश्याव्यवसाय करवून घेताना आढळले. आरोपींच्या ताब्यातून चार पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे. तसेच हॉटेलमध्ये ग्राहकांना पिण्यासाठी हुक्का पुरविण्यात येत असल्याचं देखील समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून दोन मोबाइल, हुक्का पॉट आणि इतर साहित्य असा एकूण 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
April 06, 2025 12:55 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
नागपुरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, OYO रुममध्ये 4 तरुणींसोबत सुरू होतं नको ते कृत्य