Krantijyoti Vidyalay 2: 'क्रांतिज्योती विद्यालय'चा सिक्वेल येणार, निर्मात्यांनी थेटच सांगून दिलं
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
'क्रांतिज्योती विद्यालय' चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमामध्ये निर्माते आणि दिग्दर्शकांनी चित्रपटाच्या सीक्वेलची घोषणा केली आहे.
हेमंत ढोमे दिग्दर्शित 'क्रांतिज्योती विद्यालय' नुकताच जानेवारी महिन्यात रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत सर्वांचे लक्ष वेधले. पाच आठवड्यात या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 25 कोटींच्या आसपास कमाई केली आहे. चित्रपटाच्या कमाईचा आकडा पाहताच सोशल मीडियावर 'मराठी शाळा जिंकली' अशा आशयाचे पोस्टर्स व्हायरल होऊ लागले. 'क्रांतिज्योती विद्यालय' चित्रपटाच्या सक्सेसच्या पाठी अनेकांचे हात आहेत. त्यांच्यासाठी क्षिती जोगने एक खास पोस्ट शेअर केली आहे. या खास पोस्टमध्ये क्षितीने चित्रपट प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले, हातभार लागला त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
क्षिती जोगची पोस्ट
"क्रांतिज्योती हे माझं अशक्य स्वप्न, शक्य करून दाखवणारी ही माझी पोरं! अजिंक्य- चित्रपटसृष्टीचा कुठलाही अनुभव नसलेला, मर्चंट नेव्हीतला एक कॅप्टन. पण आमच्यावर आणि आमच्या स्वप्नांवर प्रचंड विश्वास ठेवून तो कायम आमच्या पाठीशी उभा राहिला. आम्हाला सतत साथ देत, आमचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यात त्याचा मोठा वाटा आहे. विराज - स्वतःची जाहिरात प्रॉडक्शन कंपनी, जाहिरातींचं काम, स्वतःसाठी चांगलं कमावणारा. पण सिनेमावरच्या प्रेमासाठी आणि त्याहून जास्त आमच्यावरच्या विश्वासासाठी तो नेहमीच जोखीम घ्यायला तयार राहिला. त्याचं हे बळ आणि विश्वास शब्दात मांडणं अशक्य आहे."
advertisement
advertisement
"हेमंत- आमच्या या मोठ्या जहाजाचा कॅप्टन. पुन्हा पुन्हा सिद्ध करून दाखवणारा की त्याच्याहून उत्तम कॅप्टन असूच शकत नाही. स्वप्न कधीच मावळू न देणारा, स्वत:च्या कल्पनांशी कधीही तडजोड न करणारा. एवढं मोठं ओझं सहजतेने, आत्मविश्वासाने आणि प्रेमाने पेलणारा. ‘झिम्मा’ हा सिनेमा कोव्हिड काळात विकत घ्यायला कोणीच तयार नव्हतं, तेव्हा हा सिनेमा शक्य करून दाखवणारी हीच पोरं. तो मोठा करणारी हीच पोरं… आणि आज क्रांतिज्योती हा आपला चित्रपट ज्या उंचीवर पोहोचला आहे, त्यामागेही हीच पोरं... मी नेहमी घेत असलेल्या वेड्या निर्णयांमध्ये, प्रत्येक धाडसामधे माझ्या सोबत ठामपणे उभं राहिल्याबद्दल या पोरांचे आभार मानायला शब्द माझ्याकडे याहून बरे शब्द नाहीत. हे असं इतकं फॅार्मल लिहायचं नव्हतं पण… माझ्यासाठी आणि आपल्या सिनेमासाठी तुम्ही जे करता त्यासाठी ही “फॅार्मल” पण मनापासून लिहिलेली कौतुकाची पोस्ट आहे."
advertisement
अलीकडेच, 'क्रांतिज्योती विद्यालय' चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या सक्सेस पार्टीमध्ये, निर्माते आणि दिग्दर्शकांनी संपूर्ण चित्रपटाच्या टीमचं आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहे. यावेळी निर्माते आणि दिग्दर्शकांनी 'क्रांतिज्योती विद्यालय' चित्रपटाच्या सीक्वेलची घोषणा केली आहे. अर्थातच दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी चाहते उत्सुक आहे. चित्रपटाचा दुसरा भाग केव्हा रिलीज होणार? चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये प्रेक्षकांना काय नवीन पाहायला मिळणार? कलाकार कोणते असणार? याची अनेकांना उत्सुकता लागली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 08, 2026 8:37 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Krantijyoti Vidyalay 2: 'क्रांतिज्योती विद्यालय'चा सिक्वेल येणार, निर्मात्यांनी थेटच सांगून दिलं







