advertisement

Mental Toughness : मानसिकदृष्ट्या कणखर महिलांचे 'हे' गुण तुम्हीही करू शकता आत्मसात! प्रत्येक कामात येईल यश

Last Updated:

Mentally Strong Women Habits : तुम्हालाही यशस्वी आणि मानसिकदृष्ट्या कणखर व्हायचं असेल तर काही गुण तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला यशस्वी महिलांच्या काही खास गुणांबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे जगात त्यांची वेगळी ओळख बनते.

मानसिकदृष्ट्या कणखर असलेल्या महिलांमध्ये असतात हे खास गुण..
मानसिकदृष्ट्या कणखर असलेल्या महिलांमध्ये असतात हे खास गुण..
मुंबई : आता महिला जवळपास प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. त्या सगळीकडे आपली छाप सोडत आहेत. महिलांना अष्टपैलू होण्यासाठी अनेकदा संघर्ष करावा लागतो. त्यातून त्या हळूहळू खूप कणखर आणि यशस्वी होत जातात. भागातील मोठमोठ्या क्षेत्रात मोठ्या पोस्टवर काम करणाऱ्या महिलांचे अनेक प्रेरणा देणारे किस्से तुम्हाला इंटरनेटवर पाहायला मिळतील.
तुम्हालाही त्या महिलांप्रमाणे यशस्वी आणि मानसिकदृष्ट्या कणखर व्हायचं असेल तर काही गुण तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला यशस्वी महिलांच्या काही खास गुणांबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे जगात त्यांची वेगळी ओळख बनते. तुम्ही हे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करू शकता.
मानसिकदृष्ट्या कणखर असलेल्या महिलांमध्ये असतात हे खास गुण..
भावनांवर नियंत्रण ठेवता येणे : मानसिकदृष्ट्या कणखर असलेल्या महिलांचे त्यांच्या भावनांवर नियंत्रण असते. त्यांना कधी शांत राहायचे आणि कधी रोखठोखपणे बोलायचं आहे हे माहित असतं. दुःखी किंवा रागावल्यावर त्यांचा संयम सुटत नाही. तज्ञांचा असा विश्वास आहे की, तुमच्या भावनिक बुद्धिमत्तेचा (EQ) योग्यरित्या वापर करणे ही मानसिकदृष्ट्या खाखर होण्याची पहिली पायरी आहे.
advertisement
बदल स्वीकारणे : जगात एकमेव गोष्ट कायम असते ती म्हणजे बदल. कणखर महिला बदलाला घाबरत नाहीत, तर त्याऐवजी संधी म्हणून पाहतात. करिअर बदल असो किंवा वैयक्तिक, त्या लवचिक राहतात. भूतकाळाबद्दल शोक करण्याऐवजी वर्तमानात जगणे आणि भविष्यासाठी नियोजन करणे, यावर त्यांचा भर असतो.
नाही म्हणण्याची कला : सर्वांना खूश करण्याचा प्रयत्न करणे हे मानसिक थकव्याचे एक प्रमुख कारण आहे. कणखर व्यक्तिमत्त्व असलेल्या स्त्रियांना त्यांचे प्राधान्य म्हणजेच प्रायॉरिटीज माहित असतात. तिच्या प्रगतीमध्ये किंवा मनःशांतीला अडथळा आणणाऱ्या गोष्टींना ती सहज नाही म्हणते, कोणताही गिल्ट न बाळगता. हे स्वाभिमानाचे लक्षण आहे.
advertisement
इतरांच्या यशाचा हेवा न करणे : मानसिक खणखरतेसाठी आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे मत्सर नसणे. कणखर महिला इतरांच्या यशाची भीती किंवा हेवा करत नाहीत, तर त्यापासून प्रेरणा घेतात. त्यांना समजते की, प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. स्वतःची इतरांशी तुलना करण्याऐवजी, त्या प्रत्येकवेळी स्वतःला सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतात.
चुकांमधून शिकणे : ज्यांना पराभवाची भीती वाटत नाही, त्यांच्यातच विजय मिळवण्याची क्षमता असते. मानसिकदृष्ट्या कणखर महिला इतरांना दोष देण्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या चुकांची जबाबदारी घेतात. त्या त्यांच्या उणीवा ओळखतात आणि पुन्हा ती चूक करत नाहीत. ही शिकण्याची वृत्ती त्यांना प्रत्येक परिस्थितीत यशस्वी बनवते.
advertisement
शिकण्यात लाज न बाळगणे : मानसिकदृष्ट्या कणखर महिलांचा एक प्रमुख गुण म्हणजे त्या 'मला सर्वकाही माहित आहे' असे मानत नाहीत. त्यांना त्यांच्या ज्ञानावर विश्वास असतो, पण इतरांच्या अनुभवांचीही त्यांना कदर असते. जेव्हा त्या काहीतरी नवीन आणि चांगले शिकतात, तेव्हा त्या ते मनापासून स्वीकारतात आणि इतरांच्या ताकदी स्वीकारण्यास कधीही मागेपुढे पाहत नाहीत.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Mental Toughness : मानसिकदृष्ट्या कणखर महिलांचे 'हे' गुण तुम्हीही करू शकता आत्मसात! प्रत्येक कामात येईल यश
Next Article
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement