Dahi Toast Recipe : सकाळच्या नाश्त्याची चिंता सोडा, हेल्दी तयार करा दही टोस्ट, सोपी रेसिपी Video
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
ही रेसिपी इतकी झटपट आहे की ऑफिसला जाण्यापूर्वीही बनवता येते. चवदार असूनही हेल्दी असल्यामुळे लोकांना ती आवडते, तर चला रेसिपी पाहुयात.
मुंबई : सोशल मीडियावर नवनवीन फूड ट्रेंड्स दर काही दिवसांनी दिसत असतात. सध्या इंस्टाग्रामवर एक साधी पण आकर्षक रेसिपी दही टोस्ट सर्वत्र चर्चेत आहे. या रेसिपीने फूड लव्हर्स आणि हेल्थ कॉन्शस लोकांना वेड लावलं आहे. हजारो रील्स आणि पोस्ट्समध्ये लोक या हेल्दी आणि टेस्टफुल टोस्टचा आनंद घेताना दिसत आहेत. ही रेसिपी इतकी झटपट आहे की ऑफिसला जाण्यापूर्वीही बनवता येते. चवदार असूनही हेल्दी असल्यामुळे लोकांना ती आवडते, तर चला रेसिपी पाहुयात.
दही टोस्ट रेसिपी साहित्य
ब्रेडच्या 4 स्लाइसेस (ब्राउन/मल्टिग्रेन असतील तर उत्तम)
1 कप दही (थोडं घट्ट, ग्रीक योगर्टसारखं असेल तर चांगलं)
1 हिरवी मिरची – बारीक चिरलेली (ऐच्छिक)
थोडीशी कोथिंबीर
मीठ – चवीनुसार
काळी मिरी – चवीनुसार
हळद- चिमूटभर
मोहरी- चिमूटभर
कडीपत्ता- 10-12 पाकळ्या
चिली फ्लेक्स (ऐच्छिक)
लोणी किंवा तूप – टोस्ट करण्यासाठी (तेलही चालेल)
advertisement
दही टोस्ट कृती
दही मिश्रण तयार करा. एका बाउलमध्ये दही घ्या. त्यात हळद, लाल तिखट, मीठ, मिरी पावडर आणि चिली फ्लेक्स घाला. सर्व एकत्र छान मिसळा. मग एका पॅनमध्ये मोहरी आणि कडीपत्ता घालून दह्याला फोडणी द्या. एकत्र करून छान मिश्रण तयार करा.
advertisement
मग ब्रेडच्या स्लाइसवर हे दहीचं मिश्रण समप्रमाणात लावा.
टोस्ट करा
तवा किंवा पॅन गरम करा. त्यावर थोडं लोणी किंवा तूप लावा. दहीचं मिश्रण असलेला भाग वर ठेवून ब्रेड दोन्ही बाजूंनी मंद आचेवर टोस्ट करा, जोपर्यंत तळाशी ब्रेड खुसखुशीत आणि वरचं मिश्रण थोडं सेट होत नाही.
सर्व्हिंग:
तयार टोस्टला त्रिकोणात कापा. आवडत असेल तर वरून थोडे चिली फ्लेक्स किंवा हर्ब्स शिंपडा.
advertisement
टिप्स:
तुम्ही हवं असल्यास यात कॉर्न, बेल पेपर, चीज किंवा स्प्राउट्सही घालू शकता.
दही खूप पातळ नको, नाहीतर ब्रेड ओलसर होईल.
एअर फ्रायर किंवा सँडविच मेकरमध्येही हे टोस्ट छान तयार होतात.
हा दही टोस्ट फक्त 10 मिनिटांत तयार होतो. नाश्त्यासाठी, ऑफिसला जाण्यापूर्वी किंवा संध्याकाळच्या हेल्दी स्नॅकसाठी एकदम योग्य.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 06, 2025 5:27 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
Dahi Toast Recipe : सकाळच्या नाश्त्याची चिंता सोडा, हेल्दी तयार करा दही टोस्ट, सोपी रेसिपी Video










