Javasachi Chutney : जेवणात खाण्यासाठी पौष्टीक हवंय? बनवा सोप्या पद्धतीने जवसाची चटणी, आरोग्यसाठीही फायदा, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
दररोजच्या जेवणात जर जवसाच्या चटणीचा समावेश असेल तर पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते, असे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. कमीत कमी वेळात आणि कमीत कमी साहित्य वापरून ही पौष्टीक चटणी तयार होते.
अमरावती : दररोजच्या जेवणात पौष्टिक आहार घेतल्यास आपल्याला अनेक आरोग्याच्या समस्यांपासून सुटका मिळते. वेगवेगळ्या प्रकारच्या चटणी सुद्धा आहारात असल्यास त्यातून पोषण मिळते. त्यातीलच एक म्हणजे जवसाची चटणी. दररोजच्या जेवणात जर जवसाच्या चटणीचा समावेश असेल तर पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते, असे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. कमीत कमी वेळात आणि कमीत कमी साहित्य वापरून ही पौष्टिक चटणी तयार होते. त्याची रेसिपी अमरावतीच्या गृहिणी मंदा बहुरूपी यांनी दिली आहे.
जवसाची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
1 वाटी जवस, 4 ते 5 लसूण पाकळ्या, कडीपत्ता, 3 ते 4 लाल मिरची, चवीपुरतं मीठ आणि जिरे हे साहित्य लागेल.
advertisement
जवसाची चटणी बनवण्याची कृती
सर्वात आधी जवस भाजून घ्यायची आहे. जवस खमंग अशी भाजून घेतली की, चटणी अतिशय टेस्टी बनते. जवस भाजून घेतल्यानंतर ती काही वेळ थंड होऊ द्यायची आहे. थंड झाल्यानंतर जवस आणि इतर साहित्य मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. त्यासाठी सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात जवस टाकून घ्यायची आहे. त्यानंतर लाल मिरची टाकून घ्यायची आहे. त्यानंतर लसूण आणि जिरे टाकून घ्यायचे आहे. त्यांनतर लगेच कडीपत्ता आणि मीठ सुद्धा टाकून घ्यायचं. त्यानंतर हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे.
advertisement
सर्व मिश्रण व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. बारीक केल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर चटणी खाण्यासाठी तयार होईल. ही चटणी तुम्ही पाट्यावर सुद्धा वाटून घेऊ शकता. त्यामुळे चटणीची चव आणखी छान लागते. ही चटणी बनवल्यानंतर 15 ते 20 दिवस टिकून राहू शकते. जसं जशी चटणी मुरत जाईल तसं तशी त्याची चव आणखी वाढत जाते. तुम्ही नक्की बनवून बघा, पौष्टिक अशी जवसाची चटणी.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
May 21, 2025 5:36 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
Javasachi Chutney : जेवणात खाण्यासाठी पौष्टीक हवंय? बनवा सोप्या पद्धतीने जवसाची चटणी, आरोग्यसाठीही फायदा, Video