advertisement

प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर अजितदादांच्या अस्थींचे विसर्जन, जय पवार भावुक

Last Updated:
अजितदादा पवार यांच्या पवित्र अस्थींचे परंपरेनुसार विधीवत व आदरपूर्वक विसर्जन करण्यात आले.
1/5
उत्तर प्रदेशातील पावन प्रयागराज येथे गंगा–यमुना–सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पवित्र अस्थींचे परंपरेनुसार विधीवत व आदरपूर्वक विसर्जन करण्यात आले. या पवित्र भूमीत आत्मिक शांती, श्रद्धा व मोक्षाची अनुभूती उपस्थित कुटुंबीय व पदाधिकाऱ्यांनी घेतली.

2/5
या प्रसंगी राष्ट्रवादी परिवारातर्फे काश्मीर ते कन्याकुमारी अशी काढण्यात आलेली स्व. अजितदादा पवार यांची देशव्यापी ‘अस्थि-कलश यात्रा’ विधीवतरीत्या पूर्णत्वास गेली. हरिद्वार येथून प्रारंभ झालेल्या या राष्ट्रव्यापी यात्रेचा समारोप प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला.

3/5
या भावुक प्रसंगी स्वर्गीय अजितदादा पवार यांचे धाकटे चिरंजीव, जय पवार हे कुटुंबीयांसह प्रयागराज येथे उपस्थित होते. पुरोहितांच्या सान्निध्यात अस्थि-कलशाचे पूजन करण्यात आल्यानंतर संगमाच्या व्हीआयपी घाटावर श्रद्धेने पवित्र अस्थी संगमात प्रवाहित करण्यात आल्या.

4/5
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी परिवाराच्या वतीने पार पडलेल्या या समारोप सोहळ्यावेळी संगम घाटावर उपस्थित असलेल्या नागरिकांच्या डोळ्यांतून स्वर्गीय अजितदादा पवार यांच्याविषयीचे अपार प्रेम, आदर व सन्मान दिसून आला.

5/5
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, राष्ट्रीय सचिव धनंजय शर्मा, उत्तर प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हरिश्चंद्र सिंग, उत्तरप् रदेशातील भाजपचे प्रमुख नेते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement