Cleaning Fruits : तुम्हाला माहितीये? स्ट्रॉबेरीवर वापरतात सर्वात जास्त कीटकनाशक! तज्ज्ञांनी सांगितले क्लीनिंग हॅक..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Right Way To Clean Fruits At Home : स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि रास्पबेरी सारखी फळं चवीलाच तर उत्तम असतातच, त्याचसोबत आरोग्यासाठीही चांगली असतात. म्हणूनच त्यांना 'सुपरफूड' देखील मानले जाते. मात्र तुम्हाला त्यांना स्वच्छ करण्याचा योग्य मार्ग माहित नसेल तर ही निरोगी फळं उलट परिणाम करू शकतात. आज आम्ही तुम्हाला हि फळं स्वच्छ करण्याचा योग्य मार्ग सांगणार आहोत.
advertisement
advertisement
फक्त पाण्याने धुणं पुरेसं नाही : बेरी माती, दूषित पाणी आणि शेतातून स्टोअर शेल्फवर जाताना अनेक लोकांच्या हातातून जातात. डॉ. फिगुरा यांच्या मते, स्ट्रॉबेरी 'डर्टी डझन' फळांपैकी एक आहेत, ज्यामध्ये कीटकनाशकांचे अवशेष सर्वाधिक असतात. साधे पाणी ही रसायने आणि लपलेले बॅक्टेरिया पूर्णपणे काढून टाकत नाही.
advertisement
बेकिंग सोडा वापरा : डॉ. फिगुरा यांनी मॅसॅच्युसेट्स विद्यापीठाच्या एका अभ्यासाचा हवाला देत स्पष्ट केले की 1% बेकिंग सोडा द्रावण जंतूंना मारू शकते. यासाठी प्रथम एका मोठ्या भांड्यात 2 कप पाणी भरा. त्यात 1 चमचा बेकिंग सोडा घाला. या द्रावणात बेरी 12 ते 15 मिनिटे भिजवा. नंतर ते ताज्या पाण्याने स्वच्छ धुवा.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









