advertisement

भद्राचं सावट! चंद्र ग्रहणामुळे खरचं बदलली का होळीची तारीख? 3 की 4 मार्च, होळी नेमकी कधी?

Last Updated:
रंगांचा सण म्हणून ओळखली जाणारी 'होळी' 2026 मध्ये कधी साजरी होणार, याबाबत सध्या भाविकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. काही पंचांगानुसार 3 मार्च तर काहींनुसार 4 मार्च अशी तारीख सांगितली जात आहे.
1/7
रंगांचा सण म्हणून ओळखली जाणारी 'होळी' 2026 मध्ये कधी साजरी होणार, याबाबत सध्या भाविकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. काही पंचांगानुसार 3 मार्च तर काहींनुसार 4 मार्च अशी तारीख सांगितली जात आहे. या संभ्रमाचे मुख्य कारण म्हणजे यावर्षी होळीच्या दिवशीच लागणारे 'चंद्रग्रहण' आणि 'भद्रा' काळ. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, 2026 मध्ये होळीचा सण दोन दिवसांऐवजी तीन दिवसांच्या कालावधीत विभागला गेला आहे.

2/7
होलिका दहन (2 मार्च किंवा 3 मार्च?): पंचांगकर्त्यांच्या मते, 3 मार्च रोजी संध्याकाळी चंद्रग्रहण आणि भद्रा काळ असल्याने, काही ठिकाणी 2 मार्च 2026 च्या मध्यरात्री 12:50 ते 2:02 च्या दरम्यान होलिका दहन करणे शास्त्रसंमत मानले जात आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी 3 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 6:22 ते रात्री 8:50 या शुभ मुहूर्तावर प्रदोष काळात होळी पेटवली जाईल.

3/7
धुलिवंदन 4 मार्च 2026: चंद्रग्रहणामुळे 3 मार्च रोजी रंग खेळणे वर्ज्य मानले आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात बुधवार, 4 मार्च 2026 रोजी धुलिवंदन किंवा रंगांची होळी साजरी केली जाईल. हाच मुख्य सार्वजनिक सुट्टीचा दिवस असेल.

4/7
चंद्रग्रहणाची वेळ आणि सूतक काळ: 3 मार्च रोजी दुपारी 3:20 वाजता ग्रहणास सुरुवात होईल आणि ते संध्याकाळी 6:47 पर्यंत असेल. भारतात हे ग्रहण संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी दिसेल. या ग्रहणाचा सूतक काळ सकाळी 6:20 पासूनच सुरू होईल, ज्यामुळे दिवसा धार्मिक कृत्ये करता येणार नाहीत.

5/7
भद्रा काळाचे सावट: 3 मार्च रोजी पहाटे 4:30 पर्यंत भद्रा काळ असणार आहे. शास्त्रानुसार भद्रा काळात होलिका दहन केल्यास अशुभ फळे मिळतात, म्हणून पहाटे किंवा प्रदोष काळातील मुहूर्ताला विशेष महत्त्व दिले गेले आहे.

6/7
गुरु आणि शनीचा प्रभाव: ज्योतिषशास्त्रानुसार, यावेळची होळी कुंभ राशीत होणाऱ्या ग्रहांच्या युतीमुळे विशेष असेल. 30 वर्षांनंतर शनी आपल्या स्वराशीत असताना होणारी ही होळी काही राशींसाठी धनलाभाचे योग घेऊन येईल.

7/7
पौराणिक महत्त्व: तारखा बदलल्या तरी होळीचे आध्यात्मिक महत्त्व कायम आहे. भक्त प्रल्हादाचे रक्षण आणि होलिका दहनाद्वारे 'वाईटावर चांगल्याचा विजय' साजरा करण्यासाठी 4 मार्च रोजी गुलालाची उधळण केली जाईल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement