Imran Khan: "प्रेक्षकांना 70 वर्षांच्या व्यक्तींना पाहण्यात रस नाही..." आमिर खानचा पुतण्या 'खान ब्रदर्स'बद्दल काय म्हणाला?
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
आमिर खानचा पुतण्या आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता इम्रान खान याने एका मुलाखतीत खान ब्रदर्सवर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या वयाबद्दल अभिनेत्याने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
बॉलिवूडच्या तीन खान ब्रदर्सने गेले अनेक वर्षे फिल्म इंडस्ट्रीवर साम्राज्य केले आहेत. शाहरूख खान, सलमान खान आणि आमिर खान यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या खान ब्रदर्सने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले असून एके काळी प्रेक्षकांनी तिघांनाही भरभरून प्रेम दिले आहे. परंतु बदलत्या काळानुरूप प्रेक्षकवर्ग बदलला आणि प्रेक्षकांचीही आवड निवड बदलली. अशातच आमिर खानचा पुतण्या आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता इम्रान खान याने एका मुलाखतीत खान ब्रदर्सवर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या वयाबद्दल अभिनेत्याने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
न्यूज 18 च्या Showsha मध्ये बोलताना इम्रान खान म्हणाला की, "एका विशिष्ट वयानंतर, तुम्ही प्रमुख भूमिका साकारू शकत नाही. जुन्या कलाकारांनी किमान आपल्या वयोमानानुसार तरी का होईना भूमिका साकारायला हवी. मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेसाठी एक वयोमर्यादा असते. मुख्य भूमिका साकारण्यासाठी काही वयोमर्यादा असते, त्यामध्येच साकारणं योग्य असतं. जास्त किंवा कमी वयामध्ये असताना नायकाची भूमिका साकारणं योग्य वाटत नाही. आपल्या आयुष्यामध्ये एके काळी असा क्षण येतो, जेव्हा तुम्ही नायकाची भूमिका साकरण्यासाठी सक्षम राहत नाहीत. सलमान, शाहरूख आणि आमिरने 30 वर्षे स्टारडम अनुभवला. आता ते वयाच्या साठीमध्ये आहेत. त्यांनी त्यांच्या वयाप्रमाणे भूमिका करायला हव्या."
advertisement
मुलाखतीत इम्रान पुढे म्हणाला की, " वय वाढत गेलं की, वयाप्रमाणे भूमिका बदलणं हे प्रत्येक कलाकाराच्या सिनेकारकिर्दितील एक नैसर्गिक गोष्ट आहे." बदलत्या काळानुसार कलाकारांचे स्टारडम कसे बदलते याबद्दलही अभिनेत्याने आपली भूमिका स्पष्ट केली इम्रान म्हणाला की, "आपल्या करियरमध्ये दिवसेंदिवस प्रेक्षकवर्ग बदलत असतो. आपल्या प्रत्येक चित्रपटाला नवीन प्रेक्षक आपला चित्रपट पाहण्यासाठी येत असतो. सध्याची पिढी वयाच्या आणि अनुभवाच्या जोरावर कलाकारांसोबत जोडतात. चित्रपट पाहताना प्रेक्षक स्वत:ला त्या कथा आणि पात्रांमध्ये पाहतो, त्यामुळे त्यांना आपल्या वयाच्या जवळच्या व्यक्तीसोबत जास्त आपुलकी वाटते. तरुण पिढीला 70 वर्षांच्या व्यक्तीची गोष्ट पाहण्यात फारसा रस नसतो."
advertisement
अलीकडील बॉक्स ऑफिस ट्रेंडवरून आपण एक मुद्दा मांडू शकतो. "झिरो" नंतर, शाहरुख खानने चार वर्षांचा ब्रेक घेतला आणि "पठाण" आणि "जवान" या दोन मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या माध्यमातून तो बॉक्स ऑफिसवर परतला. तथापि, त्याच वर्षी प्रदर्शित झालेला त्याचा तिसरा चित्रपट "डंकी" बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. तो चित्रपट प्रेक्षकांच्या पसंदीस आला नाही. त्याचप्रमाणे, आमिर खानचा "लाल सिंग चड्ढा" सुद्धा फ्लॉप झाला होता. यानंतर आमिरचा गेल्या वर्षी रिलीज झालेला ‘सितारे जमीन पर’ला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. 2018 नंतर सलमान खानचे बहुतांश चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे यशस्वी ठरलेले नाहीत. ‘टायगर ३’ हा फक्त त्यातील एक अपवाद मानला जातो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 08, 2026 3:28 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Imran Khan: "प्रेक्षकांना 70 वर्षांच्या व्यक्तींना पाहण्यात रस नाही..." आमिर खानचा पुतण्या 'खान ब्रदर्स'बद्दल काय म्हणाला?







