advertisement

Moon Gochar: 10 फेब्रुवारीच्या रात्री चंद्र अशुभ राशीत; 3 राशीच्या लोकांनी आरोग्य-पैसा जपा, नुकसानीचे संकेत

Last Updated:
Astrology Marathi: ज्योतिष शास्त्रामध्ये चंद्राला शुभ ग्रह मानले जाते, पण जेव्हा कुंडलीत चंद्राची स्थिती योग्य नसते, तेव्हा आरोग्य आणि आर्थिक बाबतीत अडचणी निर्माण होऊ शकतात. 10 फेब्रुवारीच्या रात्री 01:11 वाजता चंद्र तूळ राशीतून बाहेर पडून स्वतःच्या खालच्या (नीच) राशीत म्हणजे वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. चंद्राचे हे गोचर कोणत्या राशींसाठी आव्हानात्मक ठरू शकते, ते पाहूया.
1/5
मेष - चंद्राचे हे गोचर तुमच्या राशीपासून 8 व्या स्थानी होणार आहे. या स्थानी ग्रहांची स्थिती फारशी शुभ मानली जात नाही. चंद्राच्या या भ्रमणामुळे तुम्हाला पोटाशी संबंधित आजार त्रास देऊ शकतात, त्यामुळे पचायला जड असणारे पदार्थ खाणे टाळा.

2/5
मेष राशीच्या लोकांनी पैशांच्या बाबतीतही सावध राहा, कारण लहानशी चूक देखील आर्थिक नुकसानाला कारणीभूत ठरू शकते. गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करा. उपाय म्हणून चंद्र ग्रहाच्या मंत्रांचा जप करणे फायद्याचे ठरेल.

3/5
मिथुन - तुमच्या शत्रू स्थानी म्हणजेच 6 व्या घरात चंद्र गोचर करणार आहे. त्यामुळे शत्रूंपासून सावध राहणे गरजेचे आहे. ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहिलात तर अनेक संकटांतून वाचाल. सर्दी-तापासारखे त्रास तुम्हाला सतावू शकतात. साठवलेला पैसा खर्च करणे टाळा आणि व्यवहाराच्या बाबतीत सतर्क राहा. उपाय म्हणून शिवलिंगावर जल अर्पण करावे.

4/5
धनू - तुमच्या 12 व्या घरात चंद्राचे गोचर होणार आहे. यामुळे हाताशी आलेली कामे बिघडू शकतात आणि मानसिक ताण वाढू शकतो. तुमच्या मनातील चिंता दूर करण्यासाठी घरातील लोकांशी संवाद साधा.
धनू - तुमच्या 12 व्या घरात चंद्राचे गोचर होणार आहे. यामुळे हाताशी आलेली कामे बिघडू शकतात आणि मानसिक ताण वाढू शकतो. तुमच्या मनातील चिंता दूर करण्यासाठी घरातील लोकांशी संवाद साधा.
advertisement
5/5
धनू - प्रवासादरम्यान तुमच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. पैशांची उधारी करणे किंवा कोणाला कर्ज देणे टाळा. प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे आहे. उपाय म्हणून दूध किंवा दही दान करा. 

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
धनू - प्रवासादरम्यान तुमच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. पैशांची उधारी करणे किंवा कोणाला कर्ज देणे टाळा. प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे आहे. उपाय म्हणून दूध किंवा दही दान करा.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement