advertisement

ठाकरे काँग्रेसचं गणित बिघडवणार? चंद्रपुरात धमाका होणार, मुनगंटीवार म्हणाले, आमची तयारी पूर्ण!

Last Updated:

Chandrapur Mahapalika: चंद्रपूर शहर मनपात भाजपचा महापौर होण्याच्या दृष्टीने सर्व चर्चा झाल्या असून उद्या दुपारपर्यंत निश्चित घोषणा होईल, असा गौप्यस्फोट भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

चंद्रपूर महापालिका महापौरपद निवडणूक
चंद्रपूर महापालिका महापौरपद निवडणूक
हैदर शेख, प्रतिनिधी, चंद्रपूर : चंद्रपूर महापालिकेवर आपलाच महापौर बसावा, यासाठी काँग्रेस पक्षातल्या वडेट्टीवार-धानोरकर यांच्या गटाने पक्षश्रेष्ठींसमोर दिल्लीत जाऊन सत्तेच्या वाटाघाटी केल्या. परंतु इकडे ठाकरे सेनेच्या गटाच्या मनात काही वेगळेच शिजत असल्याचे बोलले जाते. भारतीय जनता पक्षाने ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर दिली असल्याचे कळते. दुसरीकडे सत्तास्थापनेची आमची तयारी पूर्ण झाली असल्याचे सांगत महापौर आमचाच होईल, असे आत्मविश्वासाने भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
चंद्रपूर शहर मनपात भाजपचा महापौर होण्याच्या दृष्टीने सर्व चर्चा झाल्या असून उद्या दुपारपर्यंत निश्चित घोषणा होईल, असा गौप्यस्फोट भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
चंद्रपूर मनपा महापौर पद निवडून आणण्यासाठीची तयारी पूर्ण केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याशी चर्चा झाली आहे. संगीता खांडेकर आमच्या अधिकृत उमेदवार आहेत. पाठिंबा देणाऱ्या पक्षांशी चर्चा अंतिम टप्प्यात आहे. चर्चा पूर्ण झाली की लेखी स्वरूपात करार होणार आहे. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा हा करार करणार आहेत, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
advertisement

मुनगंटीवारांचे धक्क्यावर धक्के

चर्चा कॅमेरासमोर होत नाही. त्यामुळे ती बाहेर सांगणे शिष्टाचाराचा भंग होईल. आमचे खांडेकर महापौर होतील हे नक्की. मी स्वतः निधी आणि विकास कामांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोललो आहे. पूर्ण शक्तीनिशी मनपाच्या पाठीशी उभे राहू असे त्यांनी सांगितल्याचे मुनगंटीवार म्हणाले. तसेच काँग्रेसशी निवडणूक पूर्व आघाडी असलेल्या पक्षांशी आमचा संपर्क झाला आहे. मात्र ते सध्या थेट पद्धतीने आम्हाला पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत नाहीत, असेही मुनगंटीवार म्हणाले.
advertisement

काँग्रेसच्या वाटाघाटी पूर्ण, पण ठाकरेंच्या मनात काय?

काँग्रेस पक्षाला गटबाजीचे ग्रहण आहे, असे म्हणतात. चंद्रपुरात काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक जिंकून आल्याने साहजिक महापौरपदासाठी काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र वडेट्टीवार-धानोरकर यांच्या गटापैकी कुणाला काय मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाल्याने दिल्लीत पक्षश्रेष्ठींसमोर वाटाघाटी झाल्या. वडेट्टीवार आणि धानोरकर गटाने अडीच अडीच वर्षांसाठी महापौरपद वाटून घ्यावे. तसेच सत्ता पक्षातील वाटेकऱ्यांना स्थायी समितीची जबाबदारी द्यावी, अशी वरिष्ठांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु या वाटाघाटी सुरू असताना ठाकरे सेनेला महत्त्व न दिले गेल्याने ते नाराज असल्याचे कळते.
advertisement

भाजपकडून ठाकरे सेनेला सत्तेचा प्रस्ताव, ठाकरे काय करणार?

ठाकरे सेना नाराज असल्याचे कळाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने ठाकरे सेनेला सत्तेचा प्रस्ताव दिल्याचे बोलले जाते. भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेला सव्वा वर्षांचे महापौरपद तसेच
२ वर्ष स्थायी समिती देण्यास तयार असल्याचे सांगितले गेले आहे.

...तर भाजप विरोधी पक्षात बसेल!

पहिले महापौर भाजपचा की शिवसेना उबाठाचा या मुद्द्यावर चर्चा अडली आहे. कुठल्याही परिस्थितीत पहिले सव्वा वर्ष महापौर भाजपचाच करायचा, जर शिवसेनेला हा फॉर्म्युला मान्य नसेल तर भाजप विरोधी पक्षात बसेल, असे भाजपमधील विश्वासनीय सूत्रांनी माहिती दिली.
advertisement
त्यामुळे चंद्रपुरात कोण सत्तेत बसणार, कुणाचा महापौर होणार, हे अंतिमत: उद्धव ठाकरे ठरवणार आहेत. ठाकरे सेना काँग्रेसला पाठिंबा देते की भारतीय जनता पक्षाला साथ देते हे पाहणे महत्त्वाचे आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ठाकरे काँग्रेसचं गणित बिघडवणार? चंद्रपुरात धमाका होणार, मुनगंटीवार म्हणाले, आमची तयारी पूर्ण!
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement