Dhapate Recipe: नाश्त्याला काय? मराठवाडा स्टाईल दही-धपाटे बेस्ट पर्याय, पाहा अगदी सोपी रेसिपी
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Dhapate Recipe: नाश्त्याला काय बनवायचं? असा प्रश्न बऱ्याचदा गृहिणींना पडलेला असतो. अगदी सोप्या पद्धतीनं दही धपाटे रेसिपी बनवता येते.
loजालना: सकाळी नाश्त्यासाठी नवीन काय करावे? असा प्रश्न बऱ्याचदा गृहिणींना पडत असतो. तुम्हाला देखील असा प्रश्न पडत असेल तर मराठवाडा स्टाईलने तयार केलेली दही धपाटे हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. दही धपाटे कसे तयार केले जातात? त्यासाठी कोणकोणते साहित्य लागते? हेच आपण जालना येथील गंगासागर लहू पडघणकर यांच्याकडून जाणून घेऊ.
दही धपाटे बनवण्यासाठी साहित्य
दही धपाटे किंवा थालीपीठ तयार करण्यासाठी हुरडा, गहू, हरभऱ्याची डाळ, जिरे आणि ओवा यापासून तयार केलेलं धपाट्याचं पीठ लागेल. तसेच तेल, मीठ, हळद, एक ओला कापड आणि हिरव्या मिरचीचा ठेचा, पालक किंवा दुधीभोपळा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एवढं साहित्य आवश्यक असते.
advertisement
कसं बनवायचं धपाटं?
सुरुवातीला धपाट्याचे पीठ, बारीक चिरलेली पालक आणि कोथिंबीर, हिरव्या मिरचीचा ठेचा त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद हे सर्व मिश्रण चपातीच्या कणकीप्रमाणे सैलसर मळून घ्यायचं. यानंतर गॅसवर तवा ठेवून मंद आचेवर गरम करावा. तव्याला धपाटे चिटकू नये म्हणून थोडसं तेल टाकायचं. पोळपाटावर एक ओला कपडा अंथरायचा. यानंतर चपाती प्रमाणे थोडीशी कणीक घेऊन त्याला लाटण्याने न लाटता हातानेच चपाती प्रमाणे पांघून घ्यायचं.
advertisement
चपाती प्रमाणे गोल आकार झाल्यानंतर ओल्या कापडासह धपाट्याला तव्यावर टाकायचे व ओलं कापड काढून घ्यायचं. ज्वारीच्या भाकरी प्रमाणे दोन-तीन वेळा मंद आचेवर पलटून घेतल्यानंतर गरमागरम धपाटे खाण्यासाठी तयार होते.
या धपाट्याला आपण सकाळच्या नाश्त्यासाठी दही, शेंगदाण्याची किंवा तिळाची चटणी आणि लोणचं याबरोबर सर्व्ह करू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही देखील घरच्या घरी मराठवाडा स्टाईलचे दही धपाटे नक्की ट्राय करू शकता. अत्यंत कमी साहित्य आणि सोप्या पद्धतीने तयार होणारे हे दही धपाटे अत्यंत चवदार व भूक भागवणारे असतात.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
May 27, 2025 12:39 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
Dhapate Recipe: नाश्त्याला काय? मराठवाडा स्टाईल दही-धपाटे बेस्ट पर्याय, पाहा अगदी सोपी रेसिपी