Home Business: धपाट्याचा स्टॉल लावला अन् सुचली बिझनेस आयडिया, आता महिलेची कमाई लाखात!

Last Updated:

Home Business: प्रदर्शनात धपाट्याचा स्टॉल लावला अन् जालन्यातील गृहिणीचं नशीब पालटलं. आता पीठ विकून लाखोंची कमाई करतेय.

+
Home

Home Business: गृहिणीची कमाल, धपाट्याचं पीठ विकून मालामाल, कमाई पाहून आवाक व्हाल!

जालना: प्रबळ इच्छाशक्ती, प्रामाणिक कष्ट या बळावर आपण आपली स्वप्ने फुलवू शकतो. जालना जिल्ह्यातील खणेपुरी येथील गंगासागर लहू पडघनकर यांनी हे सिद्ध करून दाखवले. धपाट्यासाठी लागणाऱ्या पीठ निर्मितीच्या व्यवसायातून वार्षिक चार ते पाच लाखांचा नफा पडघणकर कुटुंब कमावते. या पिठाची विक्री मुंबई ठाणे, पुणे, नाशिक छत्रपती संभाजी नगर अशा मोठ्या शहरांमध्ये कुरिअरद्वारे केले जाते. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
“सुरुवातीला मी गिरणीच्या माध्यमातून दळण दळण्याचे काम करायचे. केवीके अंतर्गत एका प्रदर्शनामध्ये आम्ही धपाटे निर्मितीचा स्टॉल लावला होता. तेव्हा एका आजीने आम्हाला धपाट्याचं पीठ मागितलं. त्यानंतरच 30 मार्च 2022 रोजी माझ्या मनात हा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना आली. मग छोट्या स्तरावर आम्ही घरीच पीठ निर्मिती करण्यास सुरुवात केली,” असं गंगासागर सांगतात.
advertisement
कसं बनतं धपाट्याचं पीठ?
“माझ्याकडे दोन एकर शेती आहे. या शेतीमध्ये मी रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी करते. ही ज्वारी हुरड्यात आल्यानंतर त्याची कणसे काढून आणली जातात. ती भाजून तो हुरडा वाळवला जातो. यापासूनच धपाट्याचे पीठ तयार केलं जातं. अशा पद्धतीने 2022 पासून माझा हा उद्योग सुरू झाला,” असंही त्यांनी सांगितलं.
advertisement
धपाट्याचे पीठ तयार करण्यासाठी ज्वारीचा वाळलेला हुरडा, काही प्रमाणात गहू, प्रमाणानुसार हरभऱ्याची डाळ, जिरे आणि ओवा अशा प्रकारचे साहित्य आवश्यक असते. या सर्व साहित्यांना एकत्र करून पीठ गिरणीतून काढून घ्यावे लागते. या पिठाला 150 रुपये प्रति किलो असा होलसेल दर मिळतो. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, संभाजीनगर अशा मोठ्या शहरांमध्ये कुरिअरद्वारे या पिठाची विक्री केली जाते. सुरुवातीला वार्षिक केवळ एक क्विंटल पिठाची विक्री व्हायची. आता ही विक्री वार्षिक 18 क्विंटल पर्यंत पोहोचली आहे.
advertisement
5 लाखांचा निव्वळ नफा
पीठ विक्रीच्या व्यवसायातून तीन लाख रुपयांचा निव्वळ नफा होतो. तर मुंबई आणि इतर ठिकाणी लावलेल्या स्टॉलमध्ये धपाटे विक्रीतून दोन ते अडीच लाख रुपये मिळतात. अशा प्रकारे वार्षिक 4 ते 5 लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न होत असल्याचं गंगासागर लहू पडघनकर यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितलं.
मराठी बातम्या/मनी/
Home Business: धपाट्याचा स्टॉल लावला अन् सुचली बिझनेस आयडिया, आता महिलेची कमाई लाखात!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement