अजितदादांच्या विमान अपघाताचा नवा VIDEO, थरकाप उडवणारं दृश्य कॅमेऱ्यात कैद
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
२८ जानेवारी रोजी बारामती विमानतळावर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता. या अपघाताचा नवा व्हिडीओ समोर आला आहे.
जितेंद्र जाधव, प्रतिनिधी बारामती: २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळावर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला. अजित पवारांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला. या घटनेनंतर हा अपघात आहे की घातपात? यावरही बरीच चर्चा झाली. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट, रामदास कदम यांनी देखील या अपघाताबद्दल संशय व्यक्त केला आहे.
या सगळ्या घडामोडीनंतर आता अजित पवारांचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. एका स्थानिक नागरिकाने विमान कोसळल्यानंतरचा थरार आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून यात थरकाप उडवणारे दृश्य कैद झाले आहेत.
बारामती तालुक्यातील गोजुबावी इथं २८ जानेवारी रोजी सकाळी घडलेल्या दुर्दैवी विमान दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीने गावकऱ्यांसह आसपासच्या परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. विमान कोसळल्यानंतर काही क्षणांतच त्याला भीषण आग लागली. आगीच्या ज्वाळा उसळत असतानाच अचानक पुन्हा एक जोरदार स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
advertisement
या स्फोटाचा थरारक व्हिडिओ आता समोर आला असून जळत असलेल्या विमानातून मोठ्या आवाजात स्फोट होताना स्पष्ट दिसत आहे. स्फोटानंतर परिसरात धुराचे लोट पसरले आणि काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसर सील केला आणि त्यानंतर आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
Feb 15, 2026 2:10 PM IST







