advertisement

Nirmala Nawale: कारेगावच्या सरपंच मॅडमला पुन्हा डिवचलं, ग्रामपंचायती समोरच उधळल्या नोटा; Video Viral

Last Updated:
Nirmala Nawale
Nirmala Nawale
पुणे :  कारेगावच्या सरपंच निर्मला नवले या कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतात. कधी त्यांच्या विकासकामांमुळे, कधी त्यांच्या पेहरावामुळे तर कधी त्यांच्या आलिशान गाड्यांच्या आवडी-निवडीमुळे त्या चर्चेत राहिल्या आहेत. मात्र, सध्या त्या त्यांच्या निवडणुकीतील पराभवामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. पंचायत समिती कारेगाव गणातून झालेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार मनिषा पाचंगे यांनी निर्मला नवले यांचा अवघ्या 329 मतांनी पराभव केला. हा पराभव जिव्हारी लागल्यानंतर निर्मला नवले यांनी निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर पैसा,  दारू आणि ड्रग्जचा वापर करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप केला होता. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. दरम्यान आता कारेगावमधील एक व्हायरल व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
कारेगावच्या सरपंच निर्मला नवलेंना हरवल्यानंतर भाजपच्या उमेदवाराकडून कारेगाव ग्रामपंचायतीसमोर मोठ्या प्रमाणावर नोटा उधळल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमध्ये ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची गर्दी जमलेली दिसते. हे कार्यकर्ते आपल्या उमेदवाराच्या विजयाचा जल्लोष करत असून त्यांच्या अंगावर गुलाल उधळलेला दिसतो. जल्लोष सुरू असतानाच अचानक ग्रामपंचायत कार्यालयाच्या दारात मोठ्या प्रमाणावर चलनी नोटा उधळण्यात आल्याचे या व्हिडिओत स्पष्टपणे दिसते. त्याच वेळी कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत आहेत.
advertisement

स्थानिक राजकारणात मोठी खळबळ

कारेगाव ग्रामपंचायतीबाहेर जल्लोष साजरा करणारे कार्यकर्ते पंचायत समिती कारेगाव गणातून विजयी झालेल्या भाजपच्या उमेदवार मनिषा पाचंगे यांचे असल्याचा दावा केला जात आहे. तसेच उमेदवाराकडूनच ग्रामपंचायत कार्यालयासमोर पैसे उधळण्यात आल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या व्हिडिओमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.



 










View this post on Instagram























 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)



advertisement
शिरूर तालुक्यातील कारेगाव गणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उमेदवारी मिळालेल्या निर्मला नवले यांचा भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी 393 मतांनी पराभव केला. नवले यांना 6500, तर पाचंगे यांना 6693 मते मिळाली. सोशल मीडियावर प्रचंड हवा असूनही पराभव पत्करावा लागल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. कारेगावमधील या घडामोडींमुळे संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Nirmala Nawale: कारेगावच्या सरपंच मॅडमला पुन्हा डिवचलं, ग्रामपंचायती समोरच उधळल्या नोटा; Video Viral
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement