प्रवाशांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! संभाजीनगर-पुणे दरम्यान धावणार 'इतक्या बस', लगेच चेक करा वेळापत्रक

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar Bus Service : संभाजीनगर-पुणे दरम्यान धावणाऱ्या बसेसची संख्या वाढवण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार प्रवासी आता सोयीस्कर आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव घेऊ शकतात. सार्वजनिक वाहतूक अधिक सुलभ झाली आहे.

‎प्रवाशांची वाढती गर्दी पाहता संभाजीनगर-पुणे दरम्यानरोज 40 ई-बस, 35 एस.टी. बससेव
‎प्रवाशांची वाढती गर्दी पाहता संभाजीनगर-पुणे दरम्यानरोज 40 ई-बस, 35 एस.टी. बससेव
‎छत्रपती संभाजीनगर : दिवाळीचा उत्साह संपताच आता परतीचा प्रवास सुरू झाला असून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने संभाजीनगरहून पुण्यासाठी रोज तब्बल 40 ई-बस आणि 35 साध्या एस.टी. बस धावण्याचे नियोजन केले आहे. याशिवाय नागपूर, अमरावती, नांदेड, जळगाव, भुसावळ आदी शहरांसाठीही जादा बसेसची सोय करण्यात आली आहे.
‎शुक्रवारी शहरातील मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानकांसह रेल्वेस्टेशन आणि खासगी ट्रॅव्हल्सचे थांबे प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेले होते. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी पुण्याकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने महामंडळाने ही विशेष सोय केली असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, पुणे मार्ग हा संभाजीनगर आगारासाठी सर्वाधिक उत्पन्न देणारा मार्ग असल्याने प्रवाशांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या आहेत.
advertisement
‎यामध्ये 40 ई-बस, तर 15 नियमित आणि 20 जादा अशा एकूण 35 साध्या एस.टी. बस पुण्याला धावत आहेत. दरम्यान, नागपूरसाठी 15, अमरावतीसाठी 2, अकोल्यासाठी 4, तसेच जळगाव आणि भुसावळसाठी प्रत्येकी 5 बस सोडण्यात आल्या आहेत. यवतमाळ, उमरखेड, पुसद यांसारख्या मार्गांवरही प्रवाशांच्या मागणीनुसार अतिरिक्त बसेस पाठवल्या जात असल्याचे महामंडळाने सांगितले.
advertisement
‎खासगी ट्रॅव्हल्सचीही बुकिंग पूर्ण भरली असून, सीट न मिळाल्याने अनेक प्रवाशांनी टॅक्सी शेअरिंगच्या पद्धतीने पुण्याकडे निघण्याचा पर्याय स्वीकारला आहे.संभाजीनगर ते पुणे मार्गावर सध्या प्रवासी गर्दी वाढली असून, येत्या काही दिवसांत ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.‎
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
प्रवाशांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! संभाजीनगर-पुणे दरम्यान धावणार 'इतक्या बस', लगेच चेक करा वेळापत्रक
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement