'शपथ सांगतो, सुनेत्रावहिनी..', सुनील तटकरेंचं बारामतीत मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. मात्र या निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवार उभा केला आहे. काँग्रेसकडून अॅडव्होकेट आकाश मोरे यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे बारामतीत बिनविरोध निवडणूक होणार नाही, हे जवळपास निश्चित झालं आहे.
दरम्यान, आज सनेत्रा पवार यांनी या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यासाठी बारामतीत महायुतीचे सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी देखील सुनेत्रा पवारांच्या अर्ज भरण्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. अर्ज भरण्यापूर्वी झालेल्या कार्यक्रमात सुनील तटकरे यांनी भाषण केलं. यात त्यांनी ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आवाहन केलं.
advertisement
सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?
बारामतीमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात सुनील तटकरे म्हणाले की, मी सर्वच राजकीय पक्षांना विनंती करतो, बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. पण जर ही निवडणूक लादलीच तर शपथ सांगतो, 1952 पासून निवडणुका होत आहेत, आतापर्यंतच्या विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात जो कोणी उमेदवार सर्वाधिक मताधिक्याने निवडून आला असेल, त्यापेक्षा जास्त मतांनी सुनेत्रा वहिनींना निवडून आणायचा, हा संकल्प आपण सर्वांनी करावा, हीच अजितदादांना श्रद्धांजली ठरेल, असं सुनील तटकरे यावेळी म्हणाले.
advertisement
सुनेत्रावहिनी तुम्हाला एकच विनंती आहे. आज तुम्ही अर्ज भरा...त्यानंतर जसे अजितदादा शेवटची सभा घ्यायचे, तसे शेवटच्या सभेलाच तुम्ही या...अशी विनंतीही सुनील तटकरेंनी केली. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
Apr 06, 2026 1:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'शपथ सांगतो, सुनेत्रावहिनी..', सुनील तटकरेंचं बारामतीत मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?






