advertisement

मुलगी का झाली? पत्नी अन् चिमुकलीसोबत भयंकर प्रकार, छ. संभाजीनगरात नात्याला काळीमा!

Last Updated:

Chhatrapati Sambhajiangar: घर बांधण्यासाठी माहेराहून दीड लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करण्यात येत होती. पैसे न आणल्याने पत्नीला घराबाहेर काढले.

मुलगी का झाली? पत्नी अन् चिमुकलीसोबत भयंकर प्रकार, छ. संभाजीनगरात नात्याला काळीमा!
मुलगी का झाली? पत्नी अन् चिमुकलीसोबत भयंकर प्रकार, छ. संभाजीनगरात नात्याला काळीमा!
छत्रपती संभाजीनगर: ‘आम्हाला मुलगा हवा होता’ असे सांगत एका विवाहितेला तिच्या अल्पवयीन मुलीसह घराबाहेर काढल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आला आहे. मुलगी जन्माला आल्याचा राग तसेच घर बांधण्यासाठी माहेराहून दीड लाख रुपये आणण्याची सक्ती, या कारणांमुळे 32 वर्षीय महिलेचा 2018 ते 2025 या सात वर्षांच्या कालावधीत सातत्याने छळ करण्यात आल्याची तक्रार आहे.
‎‎या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींमध्ये पती विशाल सुरडकर, सासू चंद्रकला सुरडकर, सासरे साहेबराव सुरडकर (रा. रानअंत्री, ता. चिखली, जि. बुलढाणा), नणंद नंदिनी काकडे, दिर उमेश सुरडकर, जाऊ वंदना उमेश सुरडकर (रा. आंबेडकरनगर) तसेच नलिनी गजानन खरात (रा. कैलासनगर) यांचा समावेश आहे.
advertisement
‎फिर्यादी महिलेच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर काही काळानंतरच तिला मुलगी झाली. त्यानंतर ‘आम्हाला मुलगा हवा होता’ असे म्हणत तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला. शिवीगाळ, मारहाण आणि वारंवार अपमानित करण्याचे प्रकार घडत होते. याशिवाय घर बांधण्यासाठी माहेराहून दीड लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करण्यात येत होती. पैसे न आणल्यास मारहाण केली जात असल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे.
advertisement
‎छळाची तीव्रता वाढत गेल्यानंतर अखेरीस पीडितेला तिच्या अल्पवयीन मुलीसह घराबाहेर हाकलण्यात आले. पुन्हा सासरी परत आल्यास जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचाही आरोप तिने केला आहे.या प्रकरणात फिर्यादीची आई समजावणीसाठी सासरी गेली असता, त्यांनाही शिवीगाळ व मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच कैलासनगर येथील नलिनी गजानन खरात यांनी पतीला भडकावून मारहाण व त्रास देण्यास प्रवृत्त केल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे.संपूर्ण प्रकाराबाबत सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शेख करीत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मुलगी का झाली? पत्नी अन् चिमुकलीसोबत भयंकर प्रकार, छ. संभाजीनगरात नात्याला काळीमा!
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement