Shahu Maharaj Jayanti 2025: राजर्षी शाहू महाराजांना दिली अनोखी मानवंदना, चिमुकल्यांनी कडधान्यांपासून साकारले व्यक्तिचित्र, Video

Last Updated:

राजर्षी शाहू महाराज छत्रपती यांची 151 वी जयंती राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी होत आहे. यानिमित्ताने कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील बटरफ्लाय इंटरनॅशनल स्कूलच्या चिमुकल्यांनी कडधान्यांपासून व्यक्तीचित्र साकारत लोकराजास अनोखी मानवंदना दिली आहे.

+
राजर्षी

राजर्षी शाहू महाराज यांचे कडधान्यांपासून साकारलेले व्यक्तीचित्र 

सांगली: न्याय, समता आणि बंधुभावाची मूल्ये समाजमनामध्ये रुजवून परिवर्तनाची दिशा देणाऱ्या राजर्षी शाहू महाराज छत्रपती यांची 151 वी जयंती राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी होत आहे. यानिमित्ताने कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील बटरफ्लाय इंटरनॅशनल स्कूलच्या चिमुकल्यांनी कडधान्यांपासून व्यक्तिचित्र साकारत लोकराजास अनोखी मानवंदना दिली आहे.
लोकराजास अनोखी मानवंदना
कलेला राजाश्रय देणाऱ्या राजर्षी शाहू महाराज छत्रपती यांच्या जयंतीनिमित्त साकारलेल्या व्यक्तिचित्राचा आकार 7×9 फूट इतका आहे. यामध्ये मूग, काळे वाटाणे, तांदूळ, डाळ, साबुदाणा, गहूमोहरी, मसूर या धान्यांचा वापर केला आहे. पाच तास व्यक्तिचित्र रेखाटत चिमुकल्यांनी राजर्षी शाहू छत्रपतींना अनोखी मानवंदना दिली आहे. लहान वयातच मुलांना आदर्शांची ओळख करून देण्याच्या हेतूने उपक्रम राबवला असल्याचे कलाशिक्षक केवल यादव सांगतात.
advertisement
अशी अनोखी मानवंदना
व्यक्तिचित्राचा आकार 7×9 फूट आहे. हे व्यक्तिचित्र साकारण्यासाठी साधारण वेळ हा 5 तास लागला आहे. व्यक्तिचित्र साकारण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग नोंदविला. हे व्यक्तिचित्र पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या सहभागाने अनेक कलाकृती
कलाशिक्षक केवल यादव यांनी यापूर्वी थेट ड्राईंग कागदावर विद्यार्थ्यांच्या हाताच्या ठशापासून छत्रपती शिवरायांची प्रतिकृती साकारून शिवजयंतीच्या शुभेच्छा देखील दिल्या होत्या. विद्यार्थांच्या सहभागाने कलाकृती साकारल्यास मुलांना कलेसह संबंधित महापुरुषांविषयी अनेक प्रश्न पडतात. त्यांची जिज्ञासूवृत्ती कायम ठेवण्यासाठी, अशा उपक्रमांची मदत होत असल्याचा अनुभव कलाशिक्षक केवल यादव यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितला.
मराठी बातम्या/कोल्हापूर/
Shahu Maharaj Jayanti 2025: राजर्षी शाहू महाराजांना दिली अनोखी मानवंदना, चिमुकल्यांनी कडधान्यांपासून साकारले व्यक्तिचित्र, Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement