advertisement

फडणवीस सरकारचं 100 दिवसांचं रिपोर्ट कार्ड जारी, कोणत्या विभागानं मारली बाजी?

Last Updated:

Mahayuti Government Report Card: 100 दिवसांत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कशी कामगिरी केली, याचं रिपोर्ट कार्ड नुकतंच भारतीय गुणवत्ता परिषदेनं जारी केलं आहे.

News18
News18
मुंबई : राज्यात महायुती सरकार स्थापन होऊन 100 दिवसांचा कालावधी लोटला आहे. या 100 दिवसांत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कशी कामगिरी केली, याचं रिपोर्ट कार्ड नुकतंच भारतीय गुणवत्ता परिषदेनं जारी केलं आहे. यात राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. या निकालानुसार वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागांचं मूल्यमापन करण्यात आलं आहे. कोणत्या विभागानं राज्यात उत्कृष्ट काम केलं, याची आकडेवारी भारतीय गुणवत्ता परिषदेनं जारी केली आहे.
यात 5 मंत्रालयीन विभागांचे सचिव, ⁠5 मंत्रालयीन विभागांचे आयुक्त, ⁠5 जिल्हाधिकारी, 5 पोलीस अधीक्षक, ⁠5 मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.), ⁠4 महापालिका आयुक्त, ⁠3 पोलीस आयुक्त, ⁠2 विभागीय आयुक्त आणि ⁠2 पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक यांची नावं जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. तसेच त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागाचं आणि अधिकाऱ्यांचं कौतुक देखील केलं आहे.
advertisement
advertisement

सर्वोत्तम कामगिरी करणारे विभाग

1. महिला व बाल विकास विभाग - 80 टक्के
2. सार्वजनिक बांधकाम विभाग - 77.95 टक्के
3. कृषी विभाग - 66.15 टक्के
4. ग्राम विकास विभाग - 63.85 टक्के
5. परिवहन व बंदरे विभाग - 61.28 टक्के

सर्वोत्तम जिल्हाधिकारी

1.जिल्हाधिकारी, चंद्रपूर - 84.29
2. जिल्हाधिकारी, कोल्हापूर - 81.14
advertisement
3. जिल्हाधिकारी, जळगाव - 80.86
4. जिल्हाधिकारी, अकोला - 78.86
5. जिल्हाधिकारी, नांदेड - 66.86

सर्वोत्तम आयुक्त / संचालक

1. संचालक, तंत्र शिक्षण - 77.43
2. आयुक्त, जमाबंदी - 72.86
3. आयुक्त, आदिवासी विकास - 72.57
4. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान - 70.18
5. आयुक्त, वैद्यकीय शिक्षण - 69.43
advertisement

सर्वोत्तम पोलीस अधीक्षक

1. पोलीस अधीक्षक, पालघर - 90.29
2. पोलीस अधीक्षक, गडचिरोली - 80.00
3. पोलीस अधीक्षक, नागपूर (ग्रामीण) - 80.00
4. पोलीस अधीक्षक, जळगाव - 65.71
5. पोलीस अधीक्षक, सोलापूर (ग्रामीण) - 64.00

सर्वोत्तम जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी

1. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे -९२.००
2. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर - ७९.४३
advertisement
3. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक - ७५.४३
4. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे - ७५.४३
5. जिल्हा परिषद् मुख्य कार्यकारी अधिकारी, वाशिम ७२.००

सर्वोत्तम पोलीस आयुक्त

1. पोलीस आयुक्त, मीरा भाईंदर- ८४.५७
2. पोलीस आयुक्त, ठाणे - ७६.५७
3. पोलीस आयुक्त, मुंबई रेल्वे - ७३.१४
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
फडणवीस सरकारचं 100 दिवसांचं रिपोर्ट कार्ड जारी, कोणत्या विभागानं मारली बाजी?
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement