advertisement

Vasai: आत्या ओरडली म्हणून राग आला, अल्पवयीन पुतण्याने मित्राला बोलावलं आणि...,वसईतील मन सुन्न करणारी घटना

Last Updated:

चौकशीत बनसोडे यांचा १५ वर्षीय पुतण्या अधूनमधून भेटायला येत असल्याचं समोर आलं. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

News18
News18
वसई : मुंबईजवळील वसईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून अल्पवयीन पुतण्याने मित्राच्या मदतीने आत्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना वसईत उघडकीस आली आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई पश्चिमेतील बऱ्हामपूर गावात ही घटना घडली.  दुर्गा बनसोडे (वय ६५) असं या महिलेचं नाव आहे. या वसई पश्चिमेतील बऱ्हामपूर गावातील भिमाई बंगल्यात एकट्याच राहत होत्या. त्यांची विवाहित मुलगी बोईसर येथे तर मुलगा वालीव इथं राहत असल्याने त्या एकट्याच वास्तव्यास होत्या. सोमवारी सकाळी त्यांच्या बंगल्यात मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती.
advertisement
घटनेची माहिती मिळताच माणिकपूर पोलिसांनी तपास सुरू केला. चौकशीत बनसोडे यांचा १५ वर्षीय पुतण्या अधूनमधून भेटायला येत असल्याचं समोर आलं. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
आत्याचा खून का केला? 
रविवारी पुतण्या नेहमीप्रमाणे आत्याला भेटायला आला होता. त्यावेळी आत्या दुर्गा बनसोडे यांनी क्षुल्लक कारणावरून आपल्या पुतण्याला ओरडलं होतं. आत्या आपल्याला रागावल्यामुळे तो संतप्त झाला होता. त्यामुळे संतापलेल्या पुतण्याने आपल्या मित्राला बोलावलं. आत्या दुर्गा बनसोडे या घरात बेसावध असताना पुतण्याने मागून तिच्या डोक्यावर बांबूने वार केला. गंभीर दुखापतीमुळे बनसोडे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर दोघांनी मृतदेह बेडमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र ते शक्य न झाल्याने दोघे तेथून फरार झाले. दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
advertisement
आत्याच्या घरात केली चोरी
दरम्यान, आरोपी पुतण्याने शिक्षण अर्धवट सोडले असून, तीन महिन्यांपूर्वी त्याने आत्याच्या घरात चोरी केल्याचंही समोर आलं आहे. त्या घटनेनंतर दुर्गा बनसोडे यांनी घरातील दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले होते. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरलं असून, पुढील तपास माणिकपूर पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Vasai: आत्या ओरडली म्हणून राग आला, अल्पवयीन पुतण्याने मित्राला बोलावलं आणि...,वसईतील मन सुन्न करणारी घटना
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement