नाशिकमधील प्रसिद्ध कऱ्हाड बंधूंचा भेळभत्ता, स्वादिष्ट अन् कुरकुरीत चव, प्रचंड मागणी, VIDEO

Last Updated:

या दुकानात येणार ग्राहकांना येथील भेळ भत्ता आवडू लागला. तिखट आणि साधा असा हा भेळभत्ता आहे. तिखट चिवड्यात कांदा ,लसूण असतो. तर साधा म्हणजे जैन चिवड्यामध्ये कांदा, लसूण नसतो.

+
कऱ्हाड

कऱ्हाड बंधू भेळभत्ता

कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक : स्वादिष्ट,रुचकर आणि कुरकुरीत अशा नाशिकमधील कऱ्हाडबंधूंचा चविष्ट चिवडा, फारसाण आणि भेळभत्ता सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे. त्याला नाशिककरांची खूपच पसंती मिळत आहे. नाशिकमधील द्वारका परिसरात असंलेल्या कऱ्हाडबंधूंच्या दुकानावर खवय्यांची मोठी गर्दी दिसते.
कऱ्हाड बंधूनी म्हणजे गोविंदराव निंबाजी कऱ्हाड यांनी मुलगा शांताराम हे मेट्रिक उत्तीर्ण झाल्यावर 23 डिसेंबर 1974 मध्ये जुन्या देवळाली म्हणजेच आत्ताच्या द्वारका येथे 8*8 आकाराच्या टपरीमध्ये भेळभत्ता आणि चिवड्याचे दुकान सुरू केले. या दुकानाला ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांचा प्रतिसाद लाभत राहिला.
advertisement
या दुकानात येणार ग्राहकांना येथील भेळ भत्ता आवडू लागला. तिखट आणि साधा असा हा भेळभत्ता आहे. तिखट चिवड्यात कांदा ,लसूण असतो. तर साधा म्हणजे जैन चिवड्यामध्ये कांदा, लसूण नसतो. त्यामुळे लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सगळेच जण चवीने हा चिवडा खात गेले. त्यामुळे या दुकानाची ख्याती दूरवर पोहोचली.
advertisement
दरम्यान, ग्राहकांचा कल वाढत गेल्याने त्यांना जागा कमी पडू लागली. म्हणून मग वर्ष 2000 मध्ये त्यांनी त्यांनी द्वारका परिसरात एक गाळा घेतला.त्यानंतर या ठिकाणी भेळभत्ता विक्रीला सुरुवात केली. चांगल्या पद्धतीने याठिकाणी ग्राहकाची सोय होत असल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला.
निरलेक्सच्या तव्यावर कोकणी पद्धतीने बनवा झटपट घावणे, चव अशी की पुन्हा बनवाल, सोप्या रेसिपीचा VIDEO
या चिवड्यासाठी आणि भेळभत्त्या साठी लागणारे पदार्थ म्हणजे शेव,मुरमुरे,मसाले ते स्वतः बनवतात. कच्च्या मसाल्याचे प्रमाण,मसाल्याची गुणवत्ता विशिष्ट पद्धतीने ते वापरतात. यात जवळपास 24 मसाले वापरले जातात. आता या व्यवसायात त्यांची तिसरी पिढीही उतरही आहे. शिक्षणानंतर त्यांनी आपल्या वाढत्या व्यवसायाला पसंती दिली आहे.
advertisement
दर किती -
या चिवड्याचा दर हा 150 ते 200 रुपये प्रतिकिलो आहे. आपल्याला लागल्याप्रमाणे हे 20 ते 30 रुपयातही त्या त्या प्रमाणात ते हा चिवडा उपलब्ध आहे. त्यांचे मुख्य शाखाही द्वारका येथे आहे. आज नाशिकमध्ये त्यांच्या 3 शाखा आहेत. इतकेच नाही तर नाशिकबाहेरही या चिवड्याला मोठी मागणी वाढत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
नाशिकमधील प्रसिद्ध कऱ्हाड बंधूंचा भेळभत्ता, स्वादिष्ट अन् कुरकुरीत चव, प्रचंड मागणी, VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement