शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची काल अचानक प्रकृती बिघडली होती. त्यांना तातडीने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची काल अचानक प्रकृती बिघडली होती. त्यांना तातडीने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांना खोकला आणि श्वास घ्यायला त्रास उद्भवत होता. पवारांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचं वातावरण होते. मात्र, आता शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
शरद पवार यांची प्रकृती आता वेगाने सुधारत आहे. त्यांना जाणवणारा खोकल्याचा त्रासही बऱ्यापैकी कमी झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. काल सकाळी त्यांना हा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना तातडीने बारामतीवरून पुण्यात दाखल करण्यात आलं होतं. त्यांचं तातडीने सिटीस्कॅन देखील करण्यात आलं होतं. त्यांना सातत्याने खोकला लागत असल्याने डॉ. लाड यांच्या टीमकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
advertisement
शरद पवारांच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांनी काय सांगितलं?
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार औषधोपचारांना उत्तम प्रतिसाद देत आहेत. मात्र, प्रकृती पूर्णपणे स्थिर होण्यासाठी आणि संसर्गाचा धोका टाळण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना सध्या पूर्ण विश्रांतीची गरज असल्याचे सांगितलं आहे.
भेटण्यास मनाई
पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते आणि नेते उत्सुक आहेत. मात्र, रुग्णालयातील संसर्ग टाळण्यासाठी आणि त्यांना पुरेशी विश्रांती मिळावी यासाठी "सध्यातरी शरद पवारांना कुणीही भेटू नये", अशी स्पष्ट सूचना डॉक्टरांनी दिली आहे. प्रकृतीमध्ये अधिक सुधारणा होईपर्यंत कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी करू नये, असं आवाहनही करण्यात आलं आहे.
advertisement
शरद पवार यांना रुग्णालयातून कधी डिस्चार्ज मिळणार, याबाबत विचारणा केली असता डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे की, त्यांच्या प्रकृतीचे सतत निरीक्षण केलं जात आहे. पवारांची प्रकृती सुधारत असली तरी, त्यांना आरामाची गरज आहे. पुढील काही आवश्यक चाचण्या केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिला जाईल, असं डॉक्टरांनी सांगितलं.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 10, 2026 11:25 AM IST






