advertisement

ठाण्याच्या फेमस हॉटेलमध्ये P*RN फिल्मचं शूटिंग, तरुणींसोबत रोमान्स सुरू असताना पोलिसांची धाड

Last Updated:

ठाणे जिल्ह्याच्या मिरा-भाईंदर शहरात एक खळबळ उडवून देणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये चक्क P*RN फिल्मचं चित्रीकरण सुरू असल्याचं समोर आलं आहे.

News18
News18
ठाणे जिल्ह्याच्या मिरा-भाईंदर शहरात एक खळबळ उडवून देणारी घटना उघडकीस आली आहे. काशिमीरा पोलीस ठाण्यापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर असलेल्या एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये चक्क पॉर्न फिल्मचं चित्रीकरण सुरू असल्याचं समोर आलं आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ. बिनू वर्गीस यांनी या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून, पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत हॉटेलवर धाड टाकली आहे.

हॉटेल 'सोना'मध्ये सुरू होता धक्कादायक प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, काशिमीरा नाका परिसरातील 'हॉटेल सोना' येथे गेल्या काही दिवसांपासून संशयास्पद हालचाली सुरू होत्या. या ठिकाणी पॉर्न फिल्म्सचं शूटिंग सुरू असल्याची खात्रीशीर माहिती सामाजिक कार्यकर्ते डॉ. बिनू वर्गीस यांना मिळाली होती. त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी छापेमारी करताच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
advertisement
पोलिसांनी छापेमारी करत दोन रुममध्ये सुरू असलेला हा सगळा प्रकार उघडकीस आणला. या रूममध्ये पॉर्न फिल्मचे चित्रीकरण केले जात होते, त्या रूम्सची पोलिसांनी कसून पाहणी केली. तसेच हॉटेलमधील रजिस्टर आणि नोंदी जप्त करण्यात आल्या असून, त्यामध्ये निर्मात्यांनी हे शूट केल्याचं स्पष्ट होत आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून चित्रीकरणाशी संबंधित काही तांत्रिक पुरावे देखील गोळा केले आहेत.
advertisement
पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व संकलित केलेले पुरावे आता झोनल DCP (पोलीस उपायुक्त) यांच्याकडे सोपवली आहेत. या रॅकेटमध्ये मोठे निर्माते, कलाकार आणि काही हॉटेल कर्मचाऱ्यांचे संगनमत असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून लवकरच संबंधितांविरुद्ध रीतसर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
advertisement

मिरा रोडमध्ये पॉर्न फिल्म्स शूटिंगची दुसरी घटना

काही वर्षांपूर्वी मिरा रोड परिसरात अशाच प्रकारचं रॅकेट उघडकीस आलं होतं. आता पुन्हा एकदा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असा प्रकार सुरू असल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ठाण्याच्या फेमस हॉटेलमध्ये P*RN फिल्मचं शूटिंग, तरुणींसोबत रोमान्स सुरू असताना पोलिसांची धाड
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement