ladki bahin yojana : साताऱ्यात 2 दिवस आधीच लाभार्थींच्या खात्यांवर पैसे जमा होण्यास सुरुवात, महिलांनी दिली ही प्रतिक्रिया

Last Updated:

राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडक्या बहीण योजनेवरुन बराच धुरळा उडाला आहे. मात्र, आता लाडक्या बहीण योजनेतील पैसे या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिलांमध्ये आनंदाचा वातावरणही पाहायला मिळत आहे. 

+
मुख्यमंत्री

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन हप्ते महिला लाभार्थींच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. साताऱ्यातील कोरेगाव, जावळी, खटाव आणि खंडाळा तालुक्यातील महिलांच्या खात्यावर दोन दिवस आधीच पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे महायुती सरकारने राबवलेल्या या योजनेचा महिलांकडून कौतुक केले जात आहे.
advertisement
वाठार स्टेशन येथील त्रिवेणी जाधव या महिलेच्या बँक खात्यावर 2 महिन्याचे पैसे जमा झाल्याने महिलेने समाधान व्यक्त केले आहे. या महिलेने आपली घरची परिस्थिती आणि मुलाचे परिस्थितीही लोकल18 शी बोलताना कथन केली. माझा मुलगा दिव्यांग असल्याने या पैशाची मोठी मदत झाली आहे. लाडकी बहीण योजनेची मी लाभार्थी झाली आहे. माझ्या बँक खात्यावर पैसे आल्याने या पैशाचा मला आता मुलाच्या उपचारावरही फायदा होणार आहे, असे त्या म्हणाल्या.
advertisement
राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडक्या बहीण योजनेवरुन बराच धुरळा उडाला आहे. मात्र, आता लाडक्या बहीण योजनेतील पैसे या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिलांमध्ये आनंदाचा वातावरणही पाहायला मिळत आहे.
advertisement
काही महिलांचं आधार कार्ड खात्याशी लिंक नाही, त्यामुळे त्यावरही प्रत्येक जिल्ह्यात लवकरात लवकर आधार खात्याशी लिंक करून घ्यावे, असे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर बुधवार सकाळपासून आम्ही काही महिलांच्या खात्यात पैसे भरण्यास सुरुवात केली. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सायंकाळपर्यंत यशस्वीरित्या काही महिलांच्या खत्यात पैसे जमा झाले आहेत. अजूनही काही अर्जांची पडताळणी सुरू आहे. मात्र, 17 ऑगस्टपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असे प्रशासनाच्या माध्यमातून देखील सांगण्यात आले आहे.
advertisement
Independence Day 2024 : आजही भारतीय रेल्वे करतेय इंग्रजांच्या या नियमाचं पालन, पण काय आहे कारण?
सातारा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे लाभार्थ्यांची संख्या हळूहळू वाढत चालली आहे. येणाऱ्या काही तासांमध्ये मोठ्या प्रमाणावर सातारा जिल्ह्यातील महिलांच्या आणि महाराष्ट्रातील महिलांच्या अकाउंटवर पैसे येण्यास सुरुवात होईल, असेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
ladki bahin yojana : साताऱ्यात 2 दिवस आधीच लाभार्थींच्या खात्यांवर पैसे जमा होण्यास सुरुवात, महिलांनी दिली ही प्रतिक्रिया
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement