Shantanu Naidu : रतन टाटांचा 'लाडका', आता Tata Motors मध्ये मिळाली मोठी जबाबदारी, म्हणाला 'वर्तुळ पूर्ण झालं...'

Last Updated:

Shantanu Naidu Gets Top Role At Tata Motors : दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे खास मित्र शंतनू नायडूवर टाटा मोटर्समध्ये नवी जबाबदार सोपवण्यात आली आहे.

Shantanu Naidu Gets Top Role At Tata Motors
Shantanu Naidu Gets Top Role At Tata Motors
Shantanu Naidu Ratan Tata : उद्योगपती रतन टाटा यांचं गेल्या वर्षी 9 ऑक्टोबर 2024 रोजी वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं. अशातच दिवंगत रतन टाटा यांचा लाडका सहकारी आणि जिगरी मित्र शंतनू नायडू पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. रतन टाटांबरोबर शेवटच्या क्षणापर्यंत शंतनू नायडू सावलीसारखा उभा राहिला. रतन टाटांचे मानसपुत्र म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. रतन टाटांनी त्यांच्या मृत्यूपत्रात देखील शंतनू नायडूचा उल्लेख केला होता. अशातच आता शंतनूवर मोठी जबाबदारी सोपवण्यात (Shantanu Naidu Gets Top Role At Tata Motors) आली आहे. शंतनू नायडूने स्वत: याची पोस्ट करत माहिती दिली आहे.

नवीन पदावर कामाला सुरूवात - शंतनू नायडू

मला हे सांगताना आनंद होत आहे की, मी टाटा मोटर्समध्ये जनरल मॅनेजर, हेड - स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हज या नवीन पदावर कामाला सुरूवात केली आहे. मला आठवतंय की, जेव्हा माझे वडील टाटा मोटर्स प्लांटमधून पांढरा शर्ट आणि नेव्ही पँट घालून घरी येत असत आणि मी खिडकीत त्यांची वाट पाहत असायचो. आता हे वर्तुळ पूर्ण झालंय, असं शंतनू नायडू याने म्हटलं आहे.
advertisement

पाहा पोस्ट

कोण आहे शंतनू नायडू?

शंतनू हा ऑटोमोबाईल डिझाईन इंजिनियर आहे आणि त्याने कॉर्नेलमधून एमबीए देखील केले आहे. रतन टाटा यांनीच शंतनूला कॉर्नेलमधून एमबीए करण्यास मदत केली होती. यानंतर रतन टाटा स्वतः शंतनूच्या पदवीदान कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कॉर्नेल विद्यापीठात पोहोचले. नंतर शंतनूला टाटांसोबत काम करण्याची संधी मिळाली. शंतनूचीही स्वतःची कंपनी आहे. ज्याचे नाव गुडफेलो. ही कंपनी कुत्र्यांसाठी रिफ्लेक्टर कॉलर बनवते. जे अंधारात चमकतात आणि रस्त्यावरील अपघातांपासून त्यांचे संरक्षण करतात.
advertisement

दु:ख ही प्रेमाची किंमत - शंतनू नायडू

दरम्यान, रतन टाटांच्या निधनाची माहिती मिळताच शंतनू नायडूवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यावेळी शंतनू नायडूची पोस्ट व्हायरल झाली होती. तुमच्या जाण्यानं आमच्या मैत्रीत जी पोकळी निर्माण झालीय, ती भरून काढण्यासाठी मी आयुष्य घालवेन. हे दु:ख प्रेमाची किंमत आहे. गूडबाय माय लाइटहाउस असं म्हणत शंतनू नायडूने दु:ख व्यक्त केलं होतं.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shantanu Naidu : रतन टाटांचा 'लाडका', आता Tata Motors मध्ये मिळाली मोठी जबाबदारी, म्हणाला 'वर्तुळ पूर्ण झालं...'
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement