लास्ट ओव्हर ड्रामा! नेपाळ विजयाच्या उंबरठ्यावर येऊन हारली, इंग्लंडच्या पोटात गोळाच आणलेला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
खरं तर शेवटच्या ओव्हरमध्ये नेपाळला 6 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता होती. या शेवटच्या ओव्हरआधी लोकेश बामने वादळी खेळी करून संपूर्ण सामना फिरवला होता.त्यामुळे लोकेश बाम सहाजिक सामना जिंकवेल अशी आशा होती.पण तसे घडले नाही सॅम करणने उत्कृष्ट गोलंदाजी करून सामना फिरवला
Nepal vs England T20 World Cup 2026 : आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये आज मुंबईच्या वानखेडेच्या मैदानावर थरारक सामना पार पडला. या सामन्यात नेपाळने शेवटच्या बॉलपर्यंत सामना खेचून आणत इंग्लंडला विजयासाठी अक्षरशं रडवलं होतं. या सामन्यात शेवटची ओव्हर खूपच निर्णायक होती.त्यामुळे शेवटच्या बॉलमध्ये नेमका काय थरार रंगला होता? हे जाणून घेऊयात.
खरं तर शेवटच्या ओव्हरमध्ये नेपाळला 6 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता होती. या शेवटच्या ओव्हरआधी लोकेश बामने वादळी खेळी करून संपूर्ण सामना फिरवला होता.त्यामुळे लोकेश बाम सहाजिक सामना जिंकवेल अशी आशा होती.पण तसे घडले नाही सॅम करणने उत्कृष्ट गोलंदाजी करून सामना फिरवला.त्यामुळे शेवटच्या सहा बॉलमध्ये काय काय घडलं आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
Well on course for the chase! 👊
Dipendra Singh Airee & Rohit Paudel are turning it on for Nepal at the Wankhede! 🔥
Will they pull off a heist against England? 😮👇
ICC Men’s #T20WorldCup | #ENGvNEP | LIVE NOW 👉 https://t.co/dABzR5eM25 pic.twitter.com/Aox7xZg6cr
— Star Sports (@StarSportsIndia) February 8, 2026
advertisement
लास्ट ओव्हरचा थरार
19.1 – नो रन
सॅम करनने पहिला बॉल फुल-लेंथ कटर टाकला. हा बॉल
लोकेश बामला मारताच आला नाही. त्यामुळे एकही धाव काढता आली नाही.
19.2 – 1 धाव
सॅम करनने लो फुल टॉस टाकतो. पण बाम बॉल मिड-ऑफकडे मिसटाइम करतो आणि सिंगलवर समाधान मानतो.
19.3 – 1 धाव
advertisement
सॅमने टाकलेल्या बॉलवर करत केसी एक धाव काढतो.
19.4 – 2 धावा
सॅम करण चौथा बॉल यॉर्कर टाकतो. हा बॉल बाम मारतो त्यात त्याला दोन धावा काढता येतात.
19.5 – नो रन
सॅम करण पाचवा बॉल थेट ब्लॉकहोलमध्ये यॉर्कर टाकतो. हा बॉल बॅटीला लागतो पण सिंगल नाकारण्यात येते.
19.6 – 1 धाव
advertisement
शेवटच्या बॉलवर एका सिक्सछी आवश्यकता असते पण बामला एकच धाव काढता येते.
शेवटच्या ओव्हरमध्ये नेपाळला 6 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता होती पण त्यांना 5 धावा काढता आल्याने इंग्लंडने 4 धावांनी सामना जिंकला होता. इंग्लंडने दिलेल्या 184 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळला 180 धावांपर्यंत मजल मारता आली होती. विशेष म्हणजे या सामन्यात नेपाळच्या लोकेशने शेवटच्या क्षणी 18 बॉलमध्ये 39 धावांची खेळी करून सामना फिरवण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 08, 2026 7:39 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
लास्ट ओव्हर ड्रामा! नेपाळ विजयाच्या उंबरठ्यावर येऊन हारली, इंग्लंडच्या पोटात गोळाच आणलेला








