फक्त 300 रुपयांपासून चनिया चोली, नवरात्रीत करा हटके लुक, डोंबिवलीतील हे ठिकाण कोणतं?

Last Updated:

navratri shopping - तुम्हालाही तुमचा लूक अगदी ट्रेडिंग आणि सुंदर करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. डोंबिवलीमध्ये तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे.

+
नवरात्री

नवरात्री शॉपिंग डोंबिवली

साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे - गणेशोत्सवानंतर आता नवरात्रीचे वेध लागले आहेत. बाजारात सर्वत्र नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. त्यामुळे गरबा खेळणाऱ्यांसाठी हा आनंदाचा क्षण असतो. नवरात्रीमध्ये सुंदर चनिया चोली घालून अनेक जण नवरात्रीच्या दिवसात गरबा खेळण्याचा आनंद घेतात.
तुम्हालाही तुमचा लूक अगदी ट्रेडिंग आणि सुंदर करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. डोंबिवलीमध्ये तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. डोंबिवलीमध्ये फडके रोडवर असणाऱ्या कपड्यांच्या मार्केटमध्ये तुम्हाला अगदी 300 रुपयांपासून सुंदर रंगांच्या चनिया चोली मिळतील. या मार्केटमध्ये तुम्हाला चनिया चोलीच्या 10 हून अधिक प्रकारच्या व्हरायटी मिळतील. यामध्ये सर्क्युलर लेहंगा, मल्टी पॅनल चानिया चोली, अलाइन लेहंगा, मरमेड स्टाईल लेहेंगा, पेस्टल लेहंगा या सगळ्या प्रकारचे लेहंगे उपलब्ध आहेत. यामध्ये सगळ्या प्रकारचे रंग उपलब्ध आहेत.
advertisement
'वेगवेगळ्या प्रकारचे चनिया चोली हवे असतील तर सगळ्यांनी नक्की फडके रोड वर असणाऱ्या कपड्यांच्या या मार्केटला नक्की भेट द्या. आमच्याकडे सगळ्या साईजमध्ये चनिया चोली उपलब्ध आहे. वेगवेगळ्या रंगांच्या चनिया चोलींची कॉलिटी सुद्धा खूप चांगली आहे,' असे दुकानदार जगदीश यांनी सांगितले.
शेतकऱ्याच्या पोरानं नाव कमावलं, MPSC परिक्षेत मिळवली क्लास वन पोस्ट, जालन्याच्या दिपकची प्रेरणादायी कहाणी!
याठिकाणी इथे तुम्हाला ठिकठिकाणी नवरात्री स्पेशल दुकाने दिसतील. यामध्ये फक्त महिलांसाठीच नव्हे तर पुरुषांसाठी सुद्धा नवरात्रीचे कपडे उपलब्ध आहेत. तसेच पुरुषांसाठी इथे वेगवेगळे जॅकेट सुद्धा उपलब्ध आहेत. तर मग या नवरात्रीत तुम्हालाही तुमचा लूक अगदी ट्रेडिंग करायचा असेल आणि इतर सगळ्यांमध्ये आपल्या गरब्याच्या ग्रुपमध्ये हटके दिसायचे असेल तर आवर्जून डोंबिवलीतील फडके मार्केटला नक्की भेट देऊ शकता.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
फक्त 300 रुपयांपासून चनिया चोली, नवरात्रीत करा हटके लुक, डोंबिवलीतील हे ठिकाण कोणतं?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement