थर्टी फर्स्टच्या पार्टीत ही ६ कामं विसरू नका! आज ३१ डिसेंबर शेवटची संधी; अन्यथा नव्या वर्षात बसेल फटका
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
३१ डिसेंबर २०२५ ही पॅन-आधार लिंक, ITR भरणे, रिवाईज्ड रिटर्न, टॅक्स रिजीम बदल व RBI बँक लॉकर एग्रीमेंटसाठी अंतिम तारीख आहे. चुकल्यास खाते फ्रीझ किंवा नोटीस येऊ शकते.
२०२५ हे वर्ष आता निरोप घेत आहे. सगळीकडे नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह असला तरी, करदात्यांसाठी आणि बँक ग्राहकांसाठी आजचा दिवस 'डेडलाईन'चा आहे. आयकर विभाग आणि रिझर्व्ह बँकेने (RBI) काही कामांसाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. ही कामं अर्धवट राहिली तर तुमचे बँक खाते गोठवले जाऊ शकते किंवा तुम्हाला कायदेशीर नोटीस येऊ शकते.
पॅन आणि आधार लिंक
आयकर विभागाने स्पष्ट केले आहे की, ३१ डिसेंबरपर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही हे केलं नसेल, तर उद्या १ जानेवारीपासून तुमचं पॅन कार्ड 'रद्दी' (Inoperative) होईल. त्यानंतर तुम्ही ५० हजार रुपयांपेक्षा जास्त व्यवहार करू शकणार नाही आणि नवीन बँक खातेही उघडू शकणार नाही.
advertisement
बिलेटेड आयटीआर
जर तुम्ही आर्थिक वर्ष २०२४-२५ चा प्राप्तिकर परतावा (ITR) भरण्यास मुकला असाल, तर आज रात्रीपर्यंत तो भरण्याची शेवटची संधी आहे. यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल, पण जर आजची तारीख चुकली तर तुम्ही पुन्हा रिटर्न फाईल करू शकणार नाही आणि आयकर विभागाची नोटीस घरी येऊ शकते.
चुकीचा आयटीआर सुधारण्याची संधी
तुम्ही आधीच आयटीआर भरला असेल, पण त्यात काही माहिती द्यायची राहिली असेल किंवा चूक झाली असेल, तर ती सुधारण्यासाठी आज 'रिवाईज्ड रिटर्न' भरता येईल. यासाठी कोणताही अतिरिक्त दंड लागत नाही, फक्त कराची रक्कम वाढली असेल तर त्यावर व्याज द्यावे लागेल.
advertisement
आयकर विभागाची नोटीस किंवा एसएमएस
ज्या करदात्यांना प्राप्तिकर विभागाकडून चुकीच्या कपातीबद्दल (Deduction), बोगस देणगीबद्दल किंवा पॅन मिसमॅचबद्दल एसएमएस किंवा ईमेल आले आहेत, त्यांना आपली चूक सुधारून सुधारित आयटीआर भरण्यासाठी आज ३१ डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
टॅक्स रिजीम बदलण्याची शेवटची वेळ
जर तुम्ही आयटीआर भरताना जुनी किंवा नवीन टॅक्स रिजीम निवडण्यात चूक केली असेल आणि ती बदलायची असेल, तर सुधारित परताव्याच्या माध्यमातून आज रात्रीपर्यंतच हे शक्य आहे.
advertisement
बँक लॉकर एग्रीमेंट
view commentsआरबीआयच्या नवीन नियमांनुसार, बँक लॉकर असलेल्या ग्राहकांना सुधारित लॉकर करारावर स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे. जर तुम्ही अजूनही बँकेत जाऊन या कागदपत्रांची पूर्तता केली नसेल, तर तुमचे लॉकर 'फ्रीझ' केले जाऊ शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 31, 2025 2:04 PM IST
मराठी बातम्या/मनी/
थर्टी फर्स्टच्या पार्टीत ही ६ कामं विसरू नका! आज ३१ डिसेंबर शेवटची संधी; अन्यथा नव्या वर्षात बसेल फटका










