७ लाखांवर जाणार सोनं? तज्ज्ञांचा मोठा दावा; ५ वर्षांत दुप्पट नफ्यासाठी सोन्यात गुंतवणूक फायद्याची की तोट्याची?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होत असून, ५ लाखांची गुंतवणूक पुढील ५ वर्षांत दुप्पट होऊ शकते. २२ कॅरेट सोनं १२८९० रुपये ग्रॅम, चांदी २.५४ लाख रुपये किलोवर पोहोचली आहे.
सोनं खरेदी म्हटलं की आपल्याकडे आनंदाचं वातावरण असतं, पण गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमती ज्या वेगानं वाढत आहेत, ते पाहून मध्यमवर्गीयांच्या कपाळावर आठ्या आल्या आहेत. लग्नसराईसाठी दागिने घडवायचे तर खिसा रिकामा होतोय, अशी सामान्यांची तक्रार आहे. पण तुम्ही कधी दुसऱ्या बाजूने विचार केलाय का? हीच भाववाढ गुंतवणूकदारांसाठी मात्र लॉटरी ठरत आहे. जर तुम्ही आज ५ लाख रुपयांचे सोने खरेदी केले, तर ५ वर्षांनंतर त्याचे मूल्य किती असेल? याचे एक रंजक गणित आता समोर आले आहे.
सोन्याचा भाव वधारला
गेल्या ४-५ वर्षांत सोन्याने जो पल्ला गाठला आहे, तो पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. आजच्या ताज्या आकडेवारीनुसार, २२ कॅरेट सोन्याने १२,८९० रुपये प्रति ग्रॅमचा टप्पा गाठला आहे, तर सोन्याचे एक सोवरेयिन (८ ग्रॅम) चक्क १,०३,१२० रुपयांना विकले जात आहे. सोन्याच्या जोडीला चांदीनेही रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली असून, एकाच दिवसात ९ रुपयांची उडी मारत चांदी आता २,५४,००० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
advertisement
२५ वर्षांचा थक्क करणारा प्रवास
जरा मागे वळून पाहिलं तर सोन्याची ताकद लक्षात येते. सन २००० मध्ये १० ग्रॅम सोनं खरेदी करायला फक्त ४,४०० रुपये लागायचे. आज त्याच सोन्यासाठी आपल्याला १.२५ लाख रुपये मोजावे लागतात. गेल्या २५ वर्षांत सोन्याने सरासरी १४% दराने परतावा दिला आहे. विशेष म्हणजे, या काळात सोन्याने गुंतवणूकदारांना कधीही निराश केले नाही; फक्त तीन अपवाद वगळता सोन्याचा भाव नेहमीच चढा राहिला आहे.
advertisement
आजची ५ लाखांची गुंतवणूक किती परतावा देईल?
जर आज ५ लाख रुपये सोन्यात गुंतवले तर? तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या किमतीत दरवर्षी ज्या प्रकारे २५ ते ३५ टक्क्यांनी वाढ होतेय, ते पाहता पुढील ५ वर्षांत तुमचे ५ लाख दुप्पट होऊ शकतात. काही रिपोर्टनुसार, पुढील ५ वर्षांत १० ग्रॅम सोन्याची किंमत २.५ लाखांच्या पुढे जाऊ शकते, तर काही जण तर हा आकडा ७ लाखांपर्यंत जाईल असा अंदाज वर्तवत आहेत.
advertisement
गुंतवणूकदारांसाठी सेफ गेम
view commentsजागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि वाढती महागाई पाहता, आजही सोन्यासारखा सुरक्षित पर्याय दुसरा कोणताही नाही. लग्नासाठी दागिने खरेदी करताना जरी सामान्यांची ओढाताण होत असली, तरी 'गुंतवणूक' म्हणून पाहिलं तर सोनं आजही किंग आहे. भविष्याची आर्थिक तरतूद म्हणून सोन्यात केलेली गुंतवणूक हा आजचा सर्वात स्मार्ट निर्णय ठरू शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 27, 2025 2:56 PM IST
मराठी बातम्या/मनी/
७ लाखांवर जाणार सोनं? तज्ज्ञांचा मोठा दावा; ५ वर्षांत दुप्पट नफ्यासाठी सोन्यात गुंतवणूक फायद्याची की तोट्याची?










