Success Story : घरातूनच सुरू केला वाती-फुलवाती व्यवसाय, महिन्याला 1 लाख कमाई, ज्योती यांची कहाणी, Video
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
घरात बसून काहीतरी स्वतःचं करावं, कुटुंबाला हातभार लावावा अशी इच्छा अनेक महिलांची असते. अशीच इच्छा ज्योती जवरास यांची होती.
छत्रपती संभाजीनगर: घरात बसून काहीतरी स्वतःचं करावं, कुटुंबाला हातभार लावावा अशी इच्छा अनेक महिलांची असते. अशीच इच्छा ज्योती जवरास यांची होती. त्यांनी विचार केला की घरकामासोबत आपला छोटासा व्यवसाय सुरू करावा आणि तिथूनच त्यांच्या यशाचा प्रवास सुरू झाला. ज्योती यांनी वाती-फुलवाती बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. यामधून महिन्याला 1 लाखांची कमाई करतात.
ज्योती यांनी सुरुवातीला घरातूनच काम सुरू केलं. नातेवाईक, शेजाऱ्यांना त्या वाती देत असत. नंतर बचत गट सुरू करून त्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळातून थोडं कर्ज घेतलं. त्यातल्या फक्त दहा हजार रुपयांत त्यांनी काम वाढवलं. पहिल्यांदा सायकलवर बसून बाजारात जाऊन वाती विकायच्या. हळूहळू मागणी वाढू लागली. आता त्या तब्बल वीस प्रकारच्या वाती-फुलवाती तयार करतात. त्यांच्या वस्तूंना फक्त शहरातच नाही तर राज्याबाहेरूनही मागणी आहे.
advertisement
आज त्यांच्या व्यवसायात पाच महिला काम करतात आणि महिन्याला जवळपास एक लाख रुपये उत्पन्न मिळतं. ज्योती म्हणतात, माझ्या पतीने मला खूप साथ दिली. त्यांनी नोकरी सोडून माझ्यासोबत काम सुरू केलं. आम्ही दोघांनी मिळून हा व्यवसाय वाढवला. आज इतर महिलांना काम देता येतं, हेच आमचं खरं समाधान आहे.
advertisement
view commentsLocation :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Oct 30, 2025 3:22 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story : घरातूनच सुरू केला वाती-फुलवाती व्यवसाय, महिन्याला 1 लाख कमाई, ज्योती यांची कहाणी, Video







