Women Success Story : बँकेतील नोकरी सोडली, फॅशन्स ब्रँड केला सुरू, साक्षी यांची महिन्याला 70 हजार कमाई
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
साडीबद्दलचं प्रेम त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात सतत जागं होतं. त्यांच्या मते साडी ही फक्त एक वस्त्र नाही, ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि स्त्रीच्या सौंदर्याची ओळख आहे.
मुंबई: कांदिवलीतील साक्षी शिर्के या मूळच्या बँकेत नोकरी करणाऱ्या, स्थिर आणि सुरक्षित करिअर असलेल्या महिला. मात्र त्यांच्या आयुष्यातला खरा टर्निंग पॉईंट ठरला मुलाचा जन्म. तो त्यांच्या आयुष्यातला सर्वात सुंदर आणि भावनिक टप्पा होता. यानंतर त्यांनी नोकरी सोडून मुलाच्या संगोपनासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित केलं.
या काळात त्यांनी स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी हस्तनिर्मित सजावटीच्या वस्तू आणि दागिन्यांच्या निर्मितीचा छंद जोपासला. मात्र साडीबद्दलचं प्रेम त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात सतत जागं होतं. त्यांच्या मते साडी ही फक्त एक वस्त्र नाही, ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि स्त्रीच्या सौंदर्याची ओळख आहे.
हेच प्रेम व्यवसायात रूपांतरित करण्याचा निर्णय त्यांनी 2019 साली घेतला आणि त्यातून जन्म झाला ‘टियारा फॅशन्स’ या ब्रँडचा जिथे प्रत्येक साडी ही एक कथा सांगते. मग ती पारंपरिक हातमागावरील विणीची असो किंवा खास ग्राहकांसाठी खास डिझाइन केलेली कस्टम साडी असो.
advertisement
साक्षी यांना व्यवसायाचा कोणताही पूर्वानुभव नव्हता. ग्राहकांशी संवाद साधणं, बाजारपेठेचा अभ्यास, योग्य डिझाइन्सची निवड, विक्री आणि डिजिटल मार्केटिंग या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतःहून शिकल्या. जिद्द आणि सतत शिकण्याची तयारी यामुळे प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकवत गेला, असं त्या सांगतात.
advertisement
या प्रवासात त्यांना कुटुंबाचा मजबूत आधार लाभला. त्यांच्या पतीचं आणि घरच्यांचं सततचं पाठबळ हेच त्यांच्या यशामागचं मोठं कारण ठरलं. साक्षी म्हणतात, आज ‘टियारा फॅशन्स’ माझ्यासाठी केवळ एक व्यवसाय नाही, तर ते माझं स्वप्न, माझ्या मेहनतीचं प्रतीक आणि माझा आत्मविश्वास आहे.
घरातून सुरू झालेल्या या ब्रँडची लोकप्रियता आज सोशल मीडियावरही झपाट्याने वाढते आहे. त्यांच्या साड्यांमधून पारंपरिकतेसोबतच आधुनिकतेची झलकही दिसून येते. आज त्या ह्या व्यवसायातून महिन्याला 60 ते 70 हजार रुपये कमवत आहेत. नक्कीच साक्षी शिर्केंची प्रेरणादायी कहाणी नवउद्योजिकांसाठी एक आदर्श ठरेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 14, 2025 7:04 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Women Success Story : बँकेतील नोकरी सोडली, फॅशन्स ब्रँड केला सुरू, साक्षी यांची महिन्याला 70 हजार कमाई









