SBI Alert: खात्यावर नाही खिशात पैसे ठेवा! ऑनलाईन पेमेंट अडकणार, SBI कडून ग्राहकांसाठी अलर्ट!
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
SBI ने 31 डिसेंबर रोजी YONO ॲपच्या देखभालीमुळे व्यवहारात अडचणी येऊ शकतात असा अलर्ट दिला आहे. इतर डिजिटल चॅनेल्स व ATM सेवा सुरू राहतील.
खात्यावर पैसे अमाप पण खिशात दमडी नाही अशी तुमची गत असेल आणि तुम्ही 31 च्या पार्टीसाठी बाहेर पडत असाल तर थांबा! तुम्ही अडचणीत येऊ शकता. SBI ने ग्राहकांसाठी अलर्ट दिला आहे. नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. ३१ डिसेंबर रोजी एसबीआयच्या YONO या डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्मवर देखभालीचे काम सुरू आहे. त्यामुळे या काळात ग्राहकांना लॉग-इन करताना किंवा व्यवहार करताना अडचणी येऊ शकतात.
बँकेने नेमकं काय म्हटलंय?
स्टेट बँकेने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून याबद्दलची माहिती दिली आहे. "ग्राहकांना अधिक चांगला डिजिटल अनुभव देण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी योनो ॲपच्या देखभालीचे काम नियोजित करण्यात आले आहे. या कालावधीत काही वापरकर्त्यांना लॉग-इन करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो," असे बँकेने स्पष्ट केले आहे. ग्राहकांना होणाऱ्या या त्रासाबद्दल बँकेने दिलगिरीही व्यक्त केली आहे.
advertisement
तुमची कामं कशी होतील?
जर तुम्हाला या काळात तातडीने पैसे पाठवायचे असतील किंवा इतर बँकिंग व्यवहार करायचे असतील, तर गोंधळून जाण्याचं कारण नाही. बँकेने योनो ॲप व्यतिरिक्त इतर पर्यायांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही बँकेची अधिकृत वेबसाईट वापरू शकता. SBI कडे उपलब्ध असलेले इतर डिजिटल चॅनेल्स देखील या काळात सुरू राहतील. याशिवाय एटीएम सेवांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. काहीवेळा इतर अॅपवरही सर्व्हिस डाऊन असा मेसेज येऊ शकतो, त्यामुळे तुमच्याकडे थोडे पैसे काढून ठेवा. नाहीतर तुमचं नुकसान होऊ शकतं.
advertisement
"Dear YONO Users,
Scheduled maintenance is planned on 31st December 2025 from hrs to hrs to enhance user experience. Some users may face intermittent login issues during this period.
You may use our other digital banking channels during this period. We regret the inconvenience…
— State Bank of India (@TheOfficialSBI) December 30, 2025
advertisement
सावध राहा!
view commentsवर्षाचा शेवटचा दिवस असल्याने अनेकजण हॉटेल बुकिंग, खरेदी किंवा पार्ट्यांसाठी ऑनलाईन पेमेंटवर अवलंबून असतात. अशा वेळी ऐन मोक्याच्या क्षणी योनो ॲप चाललं नाही तर तुमची पंचाईत होऊ शकते. त्यामुळे शक्य असल्यास आपली महत्त्वाची आर्थिक कामं वेळेत उरकून घ्या किंवा पेमेंटसाठी यूपीआय आणि नेट बँकिंगचा पर्याय तयार ठेवा. बँकेने देखभालीची नेमकी वेळ अद्याप अपडेट केली नसली तरी, रात्रीच्या वेळेस हे काम होण्याची शक्यता जास्त असते. मात्र, तरीही सावधगिरी बाळगलेली कधीही चांगली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 31, 2025 6:57 AM IST
मराठी बातम्या/मनी/
SBI Alert: खात्यावर नाही खिशात पैसे ठेवा! ऑनलाईन पेमेंट अडकणार, SBI कडून ग्राहकांसाठी अलर्ट!











