Success Story : आईची साथ अन् घेतला निर्णय, विशालचे फास्ट फूड सेंटर ठरलं हिट, महिन्याला कमाई लाखात
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
अनेक तरुण व्यवसाय करण्याला प्रधान्य देत आहे. तरुण उद्योजक विशाल टक्केकर यांनी सातत्य, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर स्वतःचा टेस्टी राइड हा फास्ट फूड सेंटर उभा करत यशाची नवी वाट तयार केली आहे.
मुंबई : अनेक तरुण व्यवसाय करण्याला प्रधान्य देत आहे. भांडुप (पूर्व) येथील तरुण उद्योजक विशाल टक्केकर यांनी सातत्य, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर स्वतःचा टेस्टी राइड हा फास्ट फूड सेंटर उभा करत यशाची नवी वाट तयार केली आहे. एस.वाय.बी.कॉममध्ये ड्रॉप लागल्यानंतर कुटुंबाने त्यांना नोकरी करण्याचा सल्ला दिला. आपल्याकडे कोणी व्यवसाय केलेला नाही. व्यवसायात नुकसान झाले तर तू सावरू शकणार नाहीस अशा भीतीमुळे घरच्यांनी त्यांना उद्योजकतेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. मात्र विशाल यांची व्यवसाय करण्याची इच्छा पक्की होती. या निर्णयात त्यांना आईची साथ लाभली आणि तेच त्यांच्या प्रवासातील निर्णायक वळण ठरले.
विशाल यांनी भांडुप स्टेशनच्या बाहेर एक छोटी जागा घेऊन सुरुवातीला फ्रँकी विकण्यास सुरुवात केली. सुरुवातीचे दिवस अत्यंत कठीण होते, ग्राहक नव्हते, विक्री नव्हती. पण हात टेकण्याचा प्रश्नच नव्हता. सातत्य ठेवून ते रोज दुकान उघडत राहिले आणि काही दिवसांतच त्यांच्या चवीने ग्राहकांना आकर्षित करायला सुरुवात केली. हळूहळू टेस्टी राइडची ओळख वाढू लागली आणि व्यवसायाची गाडी रुळावर आली.
advertisement
आज विशाल फ्रँकीसोबतच बर्गर, सँडविच, मोमोज आणि इतर फास्ट फूड पदार्थही विकतात. ग्राहकांचा प्रतिसाद इतका उत्तम आहे की ते महिन्याला 1 लाखापर्यंत उत्पन्न कमावतात. त्यांच्या व्यवसायाला आता सहा वर्षे पूर्ण झाली असून लॉकडाउनच्या कठीण काळातही त्यांनी हार मानली नाही. वर्षभर दुकान बंद राहिल्यानंतर सुरुवातीला त्यांनी स्वतः लोकांपर्यंत डिलिव्हरी करून व्यवसाय पुन्हा उभा केला.
advertisement
विशेष म्हणजे आज विशाल यांनी दोन जणांना रोजगारदेखील दिला आहे. याचा त्यांना विशेष अभिमान आहे. मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही असे अनेकजण म्हणतात पण ते चुकीचे आहे. मेहनत, कौशल्य आणि सातत्य असेल तर कोणताही मराठी तरुण यशस्वी उद्योजक होऊ शकतो असे त्यांचे मत आहे. ग्राहकांना उत्तम गुणवत्ता देणे हाच त्यांच्या यशाचा मंत्र आहे. भांडुपच्या या तरुणाने संघर्षातून घडवलेले यश आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 04, 2025 4:33 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story : आईची साथ अन् घेतला निर्णय, विशालचे फास्ट फूड सेंटर ठरलं हिट, महिन्याला कमाई लाखात

