advertisement

Mumbai Local : वंदे भारतसारखा आरामदायी प्रवास लोकलमध्ये, लवकर धावणार नवी ट्रेन; कधीपासून करता येणार प्रवास?

Last Updated:

Vande Metro AC local Train Project in Mumbai : मुंबईतील लोकलचे दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात पण आता हा प्रवास त्यांचा अधिक आरामदायी होणार आहे. कारण लवकर रुळावर नवीन लोकल धावणार आहे मात्र ही लोकल कशी असेल?

Vande Metro AC local train project in Mumbai
Vande Metro AC local train project in Mumbai
मुंबई : मुंबईतील दररोज लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आता यांचा प्रवास अतिशय सोयीस्कर आणि अपघाताच्या भितीशिवाय होणार आहे. प्रवाशांच्या या प्रवासात नेमका कोणता बदल होणार आहे याबाबतची अपटेड जाणून घ्या.
लोकल प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार
मुंबई उपनगरी रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि जागतिक दर्जाचा करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले जात आहे. धावत्या लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासह प्रवाशांना गारेगार प्रवासाचा अनुभव देण्यासाठी मुंबई मार्गावर 'वंदे मेट्रो' प्रकारातील वातानुकूलित लोकल धावणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवासी क्षमतेत वाढ होणार असून मुंबई लोकलचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे.
advertisement
एसी वंदे मेट्रो लोकल कधी धावणार?
आवश्यकतेनुसार 12, 15 आणि 18 डब्यांच्या एसी लोकल तयार केल्या जाणार आहेत. मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळणार आहे. सर्व गाड्या सुरु झाल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि आरामदायी होईलअसा विश्वास मुंबई रेल्वे विकास महामंडळाने व्यक्त केला आहे.
advertisement
या प्रकल्पासाठी एप्रिल 2026 मध्ये निविदा प्रक्रिया सुरू होणार असून चार ते सहा महिन्यांत ती पूर्ण केली जाणार आहे. करारानंतर अडीच वर्षांत पहिली नमुना एसी लोकल तयार होईल. यशस्वी चाचणीनंतर पुढील चार ते सहा वर्षांत संपूर्ण ताफा सेवेत दाखल केला जाईल.
यात नेमकं विशेष काय?
या एसी लोकल ताशी 130 किमी वेगाने धावू शकतील. एअर-स्प्रिंग सेकंडरी सस्पेन्शनमुळे धक्केमुक्त प्रवासाचा अनुभव मिळेल. यूएसबी चार्जिंग, इन्फोटेनमेंट सिस्टीम, प्रवासी माहिती प्रणाली आणि रिअल-टाइम रूट मॅप्स अशा आधुनिक सुविधा यात असतील. गादीयुक्त आसने, दिव्यांग व व्हीलचेअर वापरकर्त्यांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local : वंदे भारतसारखा आरामदायी प्रवास लोकलमध्ये, लवकर धावणार नवी ट्रेन; कधीपासून करता येणार प्रवास?
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement