advertisement

Ambernath Traffic: महाशिवरात्री निमित्त अंबरनाथ- उल्हासनगरमधील वाहतुकीत बदल; घराबाहेर पडण्याआधी पाहा कोणते रस्ते बंद, सुरू?

Last Updated:

अंबरनाथमधील शिवमंदिरामध्ये दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त भरल्या जाणाऱ्या जत्रेनिमित्त या भागातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.

check all the information about ambernath and ulhasnagar shiv temple mahashivratri festival 2026 traffic here
check all the information about ambernath and ulhasnagar shiv temple mahashivratri festival 2026 traffic here
अंबरनाथमधील शिवमंदिरामध्ये दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त मोठी जत्रा भरते. महाशिवरात्रीच्या दिवशी अंबरनाथमध्ये मुंबईसह ठाणे, मुरबाडसारख्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथमध्ये भरल्या जाणाऱ्या जत्रेनिमित्त या भागातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. 14 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान वाहतुकीतील बदल करण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे. कोणकोणत्या परिसरामध्ये वाहतूक विभागाने वाहनबंदी केली आहे, एक नजर टाकूया..
जत्रेच्या दिवसांमध्ये, अंबरनाथ पूर्वेतल्या हिंदू स्मशानभूमीपासून गोविंद तिर्थ पुलापर्यंतचा मार्ग सर्व वाहनासाठी बंद असणार आहे. वैभव हॉटेलकडून हिंदू स्मशानभूमीपासून पुढे वडवली सेक्शन मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गाने हुतात्मा चौकाकडून मटका चौकातून पुढे जातील. असा पर्यायी मार्ग असणार आहे. त्यानंतर स्वामी समर्थ चौक परिसरातही काही मार्गांवर प्रवेश बंदी केली जाणार आहे. स्वामी समर्थ चौक परिसरात स्वामी समर्थ चौकाकडून गोविंद तिर्थ पुलामार्गे वैभव हॉटेलकडे जाणाऱ्या तसेच उल्हासनगर कॅम्प पाचमधील कैलास कॉलनीकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना स्वामी समर्थ चौक येथे प्रवेश बंद असेल.
advertisement
या मार्गाला पर्यायी मार्ग, स्वामी समर्थ चौकातून डाव्या बाजूला वळण घेऊन पुढे रोटरी क्लब वडवली सेक्शन अशी एकतर्फी वाहतूक करून पुढे हिंदु स्मशानभुमी मार्गे वैभव हॉटेलकडे जातील. तर, स्वामी समर्थ चौकातून उजव्या बाजूला वळण घेऊन पुढे कानसई मार्गे सुभाष टेकडी रस्त्याने उल्हासनगरला जातील, असा सर्व वाहनांना पर्यायी मार्ग असेल. वैभव हॉटेलकडून अंबरनाथ रेल्वे स्टेशनमार्गे मटका चौकापर्यंत येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना वैभव हॉटेलच्या इथे प्रवेश बंदी असेल. या वाहनांनी आनंदनगर एमआयडीसी टी जंक्शन येथून फॉरेस्ट नाका, लादीनाका, मटका चौक मार्गे अंबरनाथ पश्चिम इथून पुढचा पर्यायी प्रवास करावा. तर औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनांनाही असाच प्रवास करावा लागणार आहे.
advertisement
शिवाय, मटका चौकातून पूर्वेकडे जाणाऱ्या जड वाहनांनाही फॉरेस्ट नाकामार्गे वैभव हॉटेल जावे लागेल. सोबतच, पूर्वेतून येणाऱ्या हलक्या वाहनांना रोटरी क्लब येथे प्रवेश बंद असेल. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हुतात्मा चौकमार्गे प्रवास करावा लागेल. उल्हासनगरातील वाहने लोकनगरी बसस्थानकाकडून, कैलास कॉलनीकडून येणारी वाहने ओटी सेक्शन, हिललानी पोलीस ठाण्यामार्गे जातील. अशा पद्धतीने उल्हासनगर आणि अंबरनाथमधील सर्व वाहनांसाठी हा पर्यायी मार्ग असणार आहे.
advertisement
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वाहतूक बंदच्या काळामध्ये अंबरनाथ पूर्वेतील हिंदू स्मशानभुमी ते गोविंद तीर्थ पुलावर लहान वाहन पार्क करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. हिंदू स्मशान भूमी बॅरिकेडपासून वाहने आत जातील आणि बाहेर पडतील. तर, मोठी वाहने लोकनगरी मैदान येथे पार्क होतील.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Ambernath Traffic: महाशिवरात्री निमित्त अंबरनाथ- उल्हासनगरमधील वाहतुकीत बदल; घराबाहेर पडण्याआधी पाहा कोणते रस्ते बंद, सुरू?
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement