10 थरांचं ध्येय, 500 हून अधिक गोविंदा; मुंबईतलं जय जवान पुन्हा रचणार नवा रेकॉर्ड?
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
मुंबईच्या जगप्रसिद्ध 'जय जवान' गोविंदा पथकानं दहीहंडीची जय्यत तयारी सुरू केलीय.
मुंबई, 14 ऑगस्ट : हिंदू संस्कृतीमध्ये महत्त्वाचा समजला जाणारा श्रावण महिना आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. श्रीकृष्णाचा जन्म हा श्रावण महिन्यातलाच आहे. त्या निमित्तानं गोकुळाष्टमी देशभर मोठ्या उत्साहात साजरी होते. गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईत दहीहंडीची लगबग असते. मुंबईतील गोंविदा पथकांमध्ये अधिक उंच हंडी कोण लावणार? जास्तीत जास्त हंडी कोण फोडणार याची स्पर्धा रंगते. गोविंदा पथकांच्या या गर्दीत 'जय जवान' पथक हे जगप्रसिद्ध आहे. जागतिक विक्रमाची नोंद असलेल्या या पथक यावर्षीही मोठ्या उत्साहानं तयारीला लागलंय.
जोगेश्वरी पूर्वेच्या जय जवान गोविंदा पथकात 500 हून जास्त गोविंदा आहेत. या मंडळाचा सराव दहीहंडीच्या दोन महिने आधीच सुरू होतो. यंदा 7 सप्टेंबर रोजी जन्माष्टमी आहे. त्यामुळे या पथकाच्या तयारीनं वेग पकडलाय. पथकाचे समन्वयक विजय निकम यांनी या मंडळाचं यंदा काय लक्ष्य आहे हे सांगितलंय.
advertisement
'जय जवान गोविंदा पथकाची स्थापना 2000 साली संदीप ढवळे यांनी केली. सुरुवातीला या पथकात फक्त 15 ते 20 गोविंदा होते. पाच थरांपासून आम्ही आमचा प्रवास सुरू केला. मुंबई उपनगरात त्यावेळी आठ थर लावणारं गोविंदा पथक होतं. 2008 साली ठाण्यातल्या वर्तक नगरमध्ये आम्ही नऊ थर लावून वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली.
advertisement
वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं लयबद्धरित्या कमीत कमी वेळांमध्ये थड लावण्याचं प्रात्याक्षिक जय जवान पथकानं जगासमोर ठेवलं आहे. 2008 साली 9 थर लावल्यानंतर गेल्या 15 वर्षांंमध्ये आम्ही आजवर 31 वेळा नऊ थर रचले आहेत. आमचं मंडळ दहा थर लावण्यात यशस्वी होईल, अशी संपूर्ण महाराष्ट्राला खात्री आहे. साहजिकच या वर्षी देखील आम्ही दहा थर लावण्याच्या निर्धारानं मैदानात उतरणार आहोत, असं निकम यांनी सांगितलं.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 14, 2023 10:51 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
10 थरांचं ध्येय, 500 हून अधिक गोविंदा; मुंबईतलं जय जवान पुन्हा रचणार नवा रेकॉर्ड?