advertisement

सोलांग व्हॅलीमध्ये फिरायला गेली, पण परतलीच नाही! मुंबईच्या प्रियांकाचा मनालीत मृत्यू; धक्कादायक कारण समोर

Last Updated:

प्रियंका आपल्या मावशीसोबत मनालीच्या सहलीवर गेली होती. गुरुवारी त्या मनालीपासून १५ किमी अंतरावर असलेल्या जगप्रसिद्ध 'सोलांग व्हॅली'मध्ये फिरण्यासाठी गेल्या होत्या

मुंबईतील तरुणीचा मृत्यू (AI Image)
मुंबईतील तरुणीचा मृत्यू (AI Image)
मुंबई : निसर्गरम्य हिमाचलमध्ये पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या एका मुंबईकर तरुणीचा थंडीमुळे दुर्दैवी अंत झाला आहे. मुंबईतील काळाचौकी परिसरात राहणाऱ्या प्रियंका विष्णू दुखंढे या तरुणीचा मनालीत 'कोल्ड एक्स्पोजर'मुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे मुंबईतील तिच्या राहत्या परिसरात आणि नातेवाईकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका आपल्या मावशीसोबत मनालीच्या सहलीवर गेली होती. गुरुवारी त्या मनालीपासून १५ किमी अंतरावर असलेल्या जगप्रसिद्ध 'सोलांग व्हॅली'मध्ये फिरण्यासाठी गेल्या होत्या. निसर्गाचा आनंद घेऊन तिथून परत येत असताना प्रियंकाला अचानक तीव्र हुडहुडी भरली आणि तिचे शरीर थंड पडू लागले.
रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली
तिची प्रकृती वेगाने बिघडत असल्याचे पाहून मावशीने तिला तात्काळ मनालीतील स्थानिक रुग्णालयात नेलं. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच प्रियंकाचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. उत्तर भारतात सध्या कडाक्याची थंडी असून मनालीचे तापमान शून्याखाली गेले आहे. अचानक झालेल्या या तापमानातील बदलाचा प्रियंकाच्या शरीराला धक्का बसला आणि तिचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
advertisement
मनालीत सध्या केवळ थंडीच नाही, तर भूस्खलन आणि भूकंपाचे सत्रही सुरू आहे. किन्नौर जिल्ह्यात ३.५ रिश्टर स्केलचा भूकंप आणि कुल्लूमध्ये झालेल्या भूस्खलनामुळे पर्यटकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण आहे. अशातच मुंबईच्या तरुणीचा थंडीने बळी गेल्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
सोलांग व्हॅलीमध्ये फिरायला गेली, पण परतलीच नाही! मुंबईच्या प्रियांकाचा मनालीत मृत्यू; धक्कादायक कारण समोर
Next Article
advertisement
पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement