Summer Special Trains: उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायचंय? मुंबई- गुजरात धावणार विशेष एक्स्प्रेस; असं आहे नियोजन
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अनेक प्रवासी फिरायला जायचा प्लॅन करत असतात. जर तुमचा गुजरातला फिरायला जायचा प्लॅन असेल, तरही बातमी तुमच्यासाठी आहे. नव्या एक्सप्रेसमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई: बांद्रा टर्मिनल ते गुजरातसाठी पश्चिम रेल्वेकडून नव्या रेल्वेची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे मुंबई- गुजरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. एप्रिल ते जुलै या महिन्यांच्या कालावधीमध्ये या रेल्वे चालवल्या जाणार आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनिमित्त लोकं फिरायला जायचा प्लॅन करत असतात. जर तुम्ही सुद्धा फिरायला जायचा प्लॅन करू इच्छित असाल, तर सुरू झालेल्या नव्या ट्रेन प्रमाणे तुम्ही सुद्धा आपला फिरायला जायचा प्लॅन करा. नेमक्या कोणत्या तारखेपासून बांद्रा टर्मिनल ते गुजरातसाठी नव्या एक्सप्रेस ट्रेन सुरू होत आहेत, एकदा जाणून घेऊया...
प्रवाशांच्या वाढती गर्दीचे व्यवस्थित मॅनेजमेंट करण्यासाठी पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनसपासून गुजरातमधील विविध शहरांसाठी अनेक समर हॉलिडे स्पेशल एक्सप्रेसची घोषणा केली आहे. पश्चिम रेल्वेच्या डीआरएमने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ते गुजरात समर हॉलिडे स्पेशल ट्रेनची सेवा 2 एप्रिल 2026 ते 31 जुलै 2026 दरम्यान प्रवाशांना पुरवली जाणार आहे. वांद्रे टर्मिनसपासून भावनगर, गांधीधाम, भुज, वेरावल आणि उधना यांसारख्या शहरांपर्यंत सेवा पुरवली जाणार आहे.या सेवांमुळे प्रवाशांना बराच दिलासा मिळणार आहे. पश्चिम रेल्वेकडून एकूण 10 समर हॉलिडे स्पेशल ट्रेन्सची घोषणा केलेली आहे.
advertisement
- 09207- बांद्रा टर्मिनल ते भावनगर (03 एप्रिल 2026 ते 31 जुलै 2026)
- 09415- बांद्रा टर्मिनल ते गांधीधाम (02 एप्रिल 2026 ते 30 जुलै 2026)
- 09037- बांद्रा टर्मिनल ते भूज (03 एप्रिल 2026 ते 31 जुलै 2026)
- 09009- बांद्रा टर्मिनल ते भूज (05 एप्रिल 2026 ते 26 जुलै 2026)
- 09011- बांद्रा टर्मिनल ते भूज (07 एप्रिल 2026 ते 28 जुलै 2026)
- 09017- बांद्रा टर्मिनल ते वेरावल (05 एप्रिल 2026 ते 26 जुलै 2026)
- 09055- बांद्रा टर्मिनल ते उधणा (01 एप्रिल 2026 ते 29 जुलै 2026)
- 09056- उधणा ते बांद्रा टर्मिनल (01 एप्रिल 2026 ते 29 जुलै 2026)
- 09035- बांद्रा टर्मिनल ते उधणा (03 एप्रिल 2026 ते 31 जुलै 2026)
- 09056- उधणा ते बांद्रा टर्मिनल (03 एप्रिल 2026 ते 31 जुलै 2026)
advertisement
अशी ट्रेन सर्व्हिस प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. अद्याप टाईमटेबल जाहीर करण्यात आलेले नसून लवकरात लवकर तो जाहीर केला जाणार आहे. प्रवाशांना वेबसाईटवर किंवा हेल्पलाईन डेस्कवर फोन करून अपडेट मिळवण्याची माहिती दिलेली आहे. www.irctc.co.in या वेबसाईटवरून प्रवासी अपडेट मिळवू शकता किंवा 139 या हेल्पलाईन डेस्कवर फोन करून माहिती मिळवू शकता. याव्यतिरिक्त, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल आणि हरियाणातील बनमनखी स्थानकादरम्यान सुद्धा समर हॉलिडे स्पेशल ट्रेनची सेवा सुरू केलेला आहे. पश्चिम रेल्वेच्या डीआरएमने दिलेल्या माहितीनुसार, 09001 मुंबई सेंट्रल ते बनमनखी पर्यंत ही ट्रेन 31 जुलैपर्यंत धावणार आहे. ही ट्रेन आठवड्यातील दोन दिवस चालवली जाणार आहे. आठवड्यातील मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी चालवली जाईल. तर, 09002 बानमनखी ते मुंबई सेंट्रल दरम्यान ही ट्रेन १ ऑगस्टपर्यंत धावणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 23, 2026 3:52 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Summer Special Trains: उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायचंय? मुंबई- गुजरात धावणार विशेष एक्स्प्रेस; असं आहे नियोजन







