Ayodhya Ram Mandir : राम मंदिर बांधण्यासाठी आतापर्यंत किती पैसे खर्च झाले, पुढे किती कोटी रुपये खर्च होणार?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर मंदिराच्या बांधकामाला सुरूवात झाली. यानंतर 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला.
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी
अयोध्या : उत्तरप्रदेशातील अयोध्येतील भव्य आणि दिव्य राम मंदिरात श्री रामलला विराजमान झाले असून सर्व भारतीयांना मोठा आनंद झाला आहे. 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या ऐतिहासिक सोहळ्यानंतर दररोज लाखो भाविक रामललाचे दर्शन घेत आहेत. राममंदिराचे पुढच्या टप्प्यातील काम अजूनही वेगाने सुरू आहे.
या मंदिरासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्याची चर्चाही होत आहेत. त्यामुळे मग आतापर्यंत या मंदिराच्या बांधकामासाठी किती रुपये खर्च झाले आणि पुढे किती खर्च होणार आहेत, हेच आपण जाणून घेऊयात.
advertisement
अयोध्येत 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर मंदिराच्या बांधकामाला सुरूवात झाली. यानंतर 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. 500 वर्षांनंतर रामलला आपल्या घरी विराजमान झाले. अयोध्येत ऐतिहासिक, भव्य आणि दिव्य राम मंदिरात रामलला विराजमान झाले आणि कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न पूर्ण झाले. जानेवारी महिन्यात झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्याचा संपूर्ण देश साक्षीदार आहे. यानंतर या मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू झाले आहे. 2025 च्या जानेवारी महिन्यात मंदिरात राम दरबाराची स्थापनाही केली जाईल.
advertisement
आतापर्यंत किती पैसे खर्च झाले -
मंदिरासाठी आतापर्यंत 900 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च झाले असून यानंतर संपूर्ण मंदिराच्या बांधकामासाठी जवळपास 1600 ते 1800 कोटी रुपये खर्च होणार आहेत, असा अंदाज मंदिर ट्रस्टने व्यक्त केला आहे.
advertisement
निर्माण समितीचे अध्यक्ष निपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, या बांधकामावर आतापर्यंत सुमारे 900 कोटी रुपये खर्च झाले आहेत. संपूर्ण मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यास वेळ लागेल. मंदिर परिसरात इतरही बांधकाम होत आहेत. त्यामुळे संपूर्ण मंदिरावर 1,600 ते 1,800 कोटी रुपये खर्च होतील असा अंदाज असल्याचे त्यांनी सांगितले.
Location :
Ayodhya,Faizabad,Uttar Pradesh
First Published :
November 24, 2024 9:19 PM IST
मराठी बातम्या/देश/
Ayodhya Ram Mandir : राम मंदिर बांधण्यासाठी आतापर्यंत किती पैसे खर्च झाले, पुढे किती कोटी रुपये खर्च होणार?