क्षणात सर्व काही संपणार होतं…, Private Jet शेतात कोसळले; दोन्ही कॅप्टन मृत्यूच्या तोंडातून वाचले, Video
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Private Jet Crashes: विजयापूर जिल्ह्यात उड्डाण प्रशिक्षणादरम्यान रेड बर्ड एव्हिएशनचं विमान अचानक नियंत्रण सुटून थेट शेतजमिनीवर कोसळलं. या थरारक अपघातात वैमानिक आणि प्रशिक्षणार्थी जखमी झाले असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.
विजयापूर (कर्नाटक): कर्नाटकातील विजयापूर जिल्ह्यात रविवारी रेड बर्ड एव्हिएशन या प्रशिक्षण संस्थेच्या एका प्रशिक्षण विमानाने (Trainer Aircraft) आपत्कालीन लँडिंग करत अपघातग्रस्त होण्याची घटना घडली. या घटनेत विमानातील वैमानिक आणि प्रशिक्षणार्थी वैमानिक दोघेही जखमी झाले आहेत.
हा अपघात बाबळेश्वर परिसरात झाला असून, संबंधित प्रशिक्षण विमान थेट शेतजमिनीवर कोसळले. अपघाताच्या वेळी विमानात एकूण दोन जण प्रवास करत होते.
घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या स्थानिक नागरिकांनी अपघात होताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी विमानाजवळ पडलेल्या प्रशिक्षणार्थी वैमानिकाला मदत करण्याचा प्रयत्न केला. या वेळी वैमानिक मात्र उभा असल्याचे दिसून आले, तर काही नागरिकांनी या संपूर्ण घटनेचे चित्रीकरणही केले.
advertisement
या अपघातात जखमी झालेल्यांची ओळख कॅप्टन कुणाल मल्होत्रा (वैमानिक) आणि गौतम शंकर (प्रशिक्षणार्थी वैमानिक) अशी करण्यात आली आहे.
VIDEO | A private jet crashes in Karnataka’s Vijayapura. Further details awaited.
(Full video available on https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/XkN0FoV152
— Press Trust of India (@PTI_News) February 8, 2026
advertisement
या संदर्भात माहिती देताना विजयापूरचे पोलीस अधीक्षक (एसपी) लक्ष्मण बी. निम्बार्गी यांनी सांगितले की, “प्राथमिक माहितीनुसार वैमानिक आणि प्रशिक्षणार्थी दोघेही सुरक्षित आहेत. त्यांना उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताच्या वेळी हे प्रशिक्षण विमान कलबुर्गीहून बेळगावकडे उड्डाण करत होते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
अपघाताची माहिती मिळताच बाबळेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी प्राथमिक तपास सुरू केला आहे. विमान कोसळण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, आणि या घटनेबाबत अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 08, 2026 5:59 PM IST
मराठी बातम्या/देश/
क्षणात सर्व काही संपणार होतं…, Private Jet शेतात कोसळले; दोन्ही कॅप्टन मृत्यूच्या तोंडातून वाचले, Video








