Tata Punch EV: टाटाचा मोठा धमाका, आणली दणकट SUV, 468 किमी बिनधास्त फिरा!
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Tata Puch EV: एंट्री सेगमेंटमध्ये जास्त रेंज, मजबूत सुरक्षा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान (Smart Technology) देण्याचा प्रयत्न टाटाने या गाडीमधून केला आहे.
भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात नवी क्रांती घडवत ‘टाटा’ने 20 फेब्रुवारी 2026 रोजी Tata Punch.ev लॉन्च केली. ही गाडी परवडणारी, सुरक्षित, आधुनिक आणि Feature-Loaded Electric Car म्हणून सादर करण्यात आली आहे. एंट्री सेगमेंटमध्ये जास्त रेंज, मजबूत सुरक्षा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान (Smart Technology) देण्याचा प्रयत्न या गाडीमधून केला आहे.
advertisement
Punch.ev मध्ये दोन बॅटरी पर्याय दिले आहेत. ते MR (30kWh) आणि LR (40kWh) असून ARAI Tested MIDC Range 468 किमी पर्यंत आहे, तर प्रत्यक्ष वापरातील C75 Range सुमारे 335 ते 355 किमी मिळतो. फास्ट चार्जिंग सुविधा असल्याने गाडी 20 टक्के ते 80 टक्के फक्त 26 मिनिटांत चार्ज होते. DC Fast Charger, 7.2kW Wall box Charger आणि 3.3kW Home Charger असे विविध चार्जिंग पर्याय उपलब्ध आहेत. Multi-Mode Regenerative Braking आणि Paddle Shifters मुळे ब्रेक लावताना बॅटरी पुन्हा चार्ज होते.
advertisement
परफॉर्मन्सच्या बाबतीत ही गाडी दमदार आहे. काही व्हेरिएंटमध्ये City आणि Sport असे 2 Drive Modes आहेत, तर उच्च व्हेरिएंटमध्ये Eco, City आणि Sport असे 3 Drive Modes मिळतात. Electronic Parking Brake with Auto Hold, Hill Hold Assist आणि Hill Hold Control मुळे चढावर गाडी मागे घसरत नाही. चालवताना स्थिरता राखण्यासाठी इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP) दिले आहे.
advertisement
सुरक्षिततेच्या दृष्टीने Punch.ev मध्ये 6 Airbags, I-TPMS (Tyre Pressure Monitoring System), i-High Beam Alert, Camera Based Reverse Park Assist, 360° Surround View Camera System आणि Blind Spot View Monitor दिले आहेत. मजबूत बांधणीमुळे गाडीची ग्राउंड क्लिअरन्स 195mm आहे आणि वॉटर वेडिंग क्षमता 450mm आहे, त्यामुळे खराब रस्ते आणि पावसाळ्यातील पाणी यामध्येही गाडी सहज चालते.
advertisement
आराम आणि सोयीसाठी ड्रायव्हर सीट हाय एडजेस्टेबल आहे. फ्रंट व्हेंटिलेटेड लेथरेट सीट्स, व्हॉइस असिस्टेड इलेक्ट्रिक सनरूफ, वायरलेस चार्जर, प्रिझमॅटिक आणि ऑटो-डिमिंग IRVM, इलेक्ट्रिक टेलगेट रिलीझ आणि फ्रंट पॉवर विंडोज दिले आहेत. हब कॅपसह R15 स्टील व्हील तसेच उच्च व्हेरिएंटमध्ये R16 स्टील व्हील्स आणि R16 डायमंड कट अलॉय व्हील्स उपलब्ध आहेत.
advertisement
तंत्रज्ञानाच्या 20.16 सेमी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 20.3 सेमी इन्फोटेनमेंट द्वारे HARMAN™ आणि उच्च व्हेरिएंटमध्ये 26.03 सेमी HD इन्फोटेनमेंट सिस्टम Arcade.ev 2.0 सह तसेच 26.03 सेमी डिजिटल कॉकपिट नॅव्हिगेशनसह दिले आहे. Android Auto™ आणि Apple CarPlay™ (Wireless Support सह), USB Type-C + C Fast Charging Port (65W), Steering Mounted Controls, Shark Fin Antenna with GPS आणि IRA.ev तसेच Smartwatch Connectivity दिली आहे.
advertisement
Punch.ev ही कनेक्टेड कार असल्यामुळे मोबाईल App द्वारे रिमोट कमांड वापरता येतात. AC (HVAC) Control, Charge Limit Set, Lights Control आणि Vehicle Diagnostics करता येते. सुरक्षेसाठी Roadside Assistance, E-Call आणि Remote Immobilization दिले आहे. ट्रिप अॅनालिटिक्स, हेल्थ रिपोर्ट्स, ड्रायव्हिंग स्कोअर, व्हॅलेट मोड, लोकेशन शेअरिंग, चार्जिंग स्टेशन नेव्हिगेशन, होम इंटिग्रेशन, ओटीए अपडेट्स आणि चार्जिंग कंट्रोल सुविधा उपलब्ध आहेत.
advertisement
किमतीच्या बाबतीत Punch.ev ची सुरुवातीची किंमत 9.69 लाख रुपये (Introductory Ex-Showroom Mumbai) आहे. BaaS (Battery as a Service) पर्यायामध्ये गाडीची सुरुवातीची किंमत 6.49 लाख रुपये असून बॅटरीसाठी 2.6 रुपये प्रति किमी EMI द्यावी लागते. त्यामुळे सुरुवातीचा खर्च कमी होतो आणि ग्राहकांना अधिक सोय मिळते.









