Dirty Game : सिक्रेट व्हिडिओ आणि ब्लॅकमेल; खाकी वर्दीतील मीनाक्षीच निघाली खरी मास्टरमाइंड, पोलिसांनाच अडकवायची जाळ्यात

Last Updated:
पोलिसांचे निरीक्षक अरुण कुमार राय यांच्या मृत्यूनंतर मीनाक्षी शर्मा संदर्भात एका मागून एक धक्कादायक खुलासे होत आहेत.
1/11
आजच्या जगात मोबाईल, सोशल मीडिया, व्हॉट्सॲप चॅट्स आणि व्हिडिओ कॉल्स आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग झाले आहेत. नातेसंबंध जुळतात, तुटतात, कधी विश्वास वाढतो तर कधी संशय. पण हेच डिजिटल साधन कधी काळी एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात, याची कल्पनाही कोणी करत नाही. एक असंच प्रकरण समोर आलं आहे, मात्र हेच भीषण वास्तव समोर आणत आहे. खाकी वर्दीचा आडोसा घेत प्रेम, सिक्रेट व्हिडिओ आणि ब्लॅकमेलचा खेळ खेळणारी महिला शिपाई मीनाक्षी शर्मा आज संपूर्ण यूपी पोलिस दलासाठी डोकेदुखी ठरली आहे.

advertisement
2/11
यूपी पोलिसांचे निरीक्षक अरुण कुमार राय यांच्या मृत्यूनंतर मीनाक्षी शर्मा संदर्भात एका मागून एक धक्कादायक खुलासे होत आहेत. 2019 मध्ये शिपाई म्हणून भरती झालेली मीनाक्षी इतक्या कमी काळात आलिशान जीवनशैली कशी जगू लागली? एसी असलेलं घर, हातात महागडा ॲपल मोबाइल, सोन्याचे दागिने, ब्रँडेड कपडे… हे सगळं एका साध्या शिपाईच्या पगारातून शक्य कसं झालं, हा प्रश्न आता तपास यंत्रणेला पडला आहे.

3/11
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अरुण राय यांच्या आधीही मीनाक्षीचे तब्बल 9 ठाना प्रभाऱ्यांशी संबंध असल्याचा संशय आहे. अनेक वरिष्ठ अधिकारी आणि शिपायांकडून तिला महागडे मोबाइल, सोनं आणि भेटवस्तू मिळाल्याचे पुरावेही तपासात समोर येत आहेत. मीनाक्षीच्या व्हॉट्सॲप चॅट्समधून उघड झालेले राज तर पोलिस विभागालाच अस्वस्थ करणारे आहेत.

4/11
धक्कादायक बाब म्हणजे जालौन पोलीस ठाण्यात मीनाक्षी हीच जणू ‘खरी ठानेदारणी’ होती. कोणाची ड्युटी कुठे लागणार, कोणावर मेहरबानी करायची, हे सगळं निर्णय तिच्याच हातात होते. तिच्या प्रेमाच्या आणि मोहाच्या जाळ्यात अडकलेले अनेक पोलीस कर्मचारी होते. काही प्रकरणांत तर याच कारणामुळे पोलीस ठाण्याच्या आत गोळीबारही झाल्याची माहिती समोर आली आहे.

5/11
अरुण कुमार राय कसे अडकले मीनाक्षीच्या जाळ्यात?ही कहाणी जालौनमधील पोलीस सायरनच्या आवाजाने सुरू झाली आणि शेवट मृत्यूच्या धक्क्यात बदलली. 2023 च्या शेवटी कोंच कोतवालीत नव्याने बदली होऊन आलेली सिपाही मीनाक्षी शर्मा सुरुवातीपासूनच चर्चेत होती. मेरठमधील अहमदपूर उर्फ दांदूपूर गावातून आलेली ही तरुणी तिच्या तीक्ष्ण नजरेने आणि हुशार वागणुकीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. गावात तिला ‘शेरणी’ म्हणत, पण तिचं जाळं किती खोलवर पसरलेलं आहे, याची कुणालाच कल्पना नव्हती.

6/11
2019 मध्ये पोलिस दलात दाखल होताच तिने आपला खेळ सुरू केला होता. जवळीक वाढवणं, नंतर सिक्रेट व्हिडिओ आणि मेसेजच्या आधारे ब्लॅकमेल करून मोठ्या रकमा उकळणं, हा तिचा ठरलेला पॅटर्न असल्याचं तपासात समोर येत आहे. पीलीभीतमध्ये तिच्यामुळे दोन शिपायांमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली होती, पण ती बाब पोलिसांच्या चौकटीतच लपवली गेली.

7/11
जालौनमध्ये एसएचओ म्हणून कार्यरत असलेले अरुण कुमार राय हे प्रामाणिक पण एकाकी अधिकारी होते. पत्नी आणि मुले दुसऱ्या शहरात राहत असल्यामुळे ते सरकारी निवासस्थानी एकटेच राहत. मीनाक्षीचं आगमन त्यांच्या आयुष्यात वादळासारखं ठरलं. काही आठवड्यांतच ड्युटीनंतरच्या चहाच्या भेटी, फोन कॉल्स, व्हिडिओ कॉल्स सुरू झाले. प्रेमाची भूक असलेले अरुण तिच्या गोड बोलण्यात अडकत गेले.

8/11
पण हे प्रेम नव्हतं, तर एक आखलेला प्लान होता. मीनाक्षी हळूहळू महागडे कपडे, लेटेस्ट स्मार्टफोन वापरू लागली. वर्दीशिवायच पोलीस ठाण्यात येणं, ड्युटी रोस्टर ठरवणं, हे सगळं तिच्या हातात गेलं. पुढे तिने अरुणला सिक्रेट व्हिडिओ आणि मेसेजच्या आधारे ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. पैसे मागणं, दबाव टाकणं सुरू झालं.

9/11
फेब्रुवारी 2026 मध्ये मीनाक्षीचं लग्न ठरलेलं होतं आणि त्या लग्नाचा खर्चही तिने अरुणकडूनच मागितल्याचं समोर आलं आहे. सततचे वाद, ताणतणाव आणि भीतीत अरुण अडकत गेले. अखेर 6 डिसेंबर 2025 ची ती काळरात्र आली. मेरठहून थेट अरुणच्या सरकारी निवासस्थानी आलेली मीनाक्षी, बंद दरवाजा, आणि अचानक झालेला गोळीबार… अरुण मृत अवस्थेत सापडले, तर मीनाक्षी घटनास्थळावरून गायब झाली.

10/11
अरुण यांच्या पत्नी माया यांनी थेट मीनाक्षीवर हत्येचा आरोप करत एफआयआर दाखल केली. तपास सुरू झाला आणि मीनाक्षीला अटक करण्यात आली. एसआयटीच्या चौकशीत तिच्या फोनमधून मिळालेले व्हिडिओ, चॅट्स आणि जुन्या घटना हे सगळं तिला एक ब्लॅकमेलर आणि मास्टरमाइंड ठरवत आहेत.

11/11
आज मीनाक्षी जेलमध्ये आहे, पण तिच्या कहाणीने यूपी पोलिसांच्या प्रतिमेलाच काळिमा फासला आहे. ही आत्महत्या होती की खून, मीनाक्षी बळी आहे की सूत्रधार हे सगळे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, की खाकी वर्दीआड लपलेलं हे डिजिटल जाळं अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त करून गेलं आहे.

Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला; पाहा कधीही न पाहिलेले फोटो
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला
  • ज्याच्यावरून धुरंधर साकारला गेला तो चौधरी असलम कोण होता?

  • सिगारेट, पिस्तूल आणि ‘हवा-हवा’ – धुरंधरमागची खरी कहाणी थरकाप उडवणारी

  • एक माणूस, एक शहर आणि अखेरचा स्फोट – धुरंधरमागची खरी स्टोरी

View All
advertisement