advertisement

नोकरदारांसाठी खूशखबर! या तारखेपासून UPI मधून झटपट काढता येणार पैसे

Last Updated:

या अंतर्गत एप्रिल २०२६ पर्यंत एक नवीन मोबाईल ॲप लाँच केलं जाईल, ज्याद्वारे सदस्य थेट UPI वापरून आपल्या खात्यातील पैसे काढू शकतात.

News18
News18
नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. एप्रिल 2026 रोजी काही नवीन बदल होणार आहेत. त्याचा थेट फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे. आधी आपल्या हक्काचे पैसे जे कर्मचाऱ्यांना आता कधीही काढता येणार आहेत. त्यासाठी क्लेम करण्याची कटकटही राहणार नाही. EPFO चे पैसे थेट UPI वरुन काढता येणार आहेत.
तुमच्या हक्काच्या EPFO मधील पैसे काढण्यासाठी आता क्लेम फॉर्म भरून दिवसेंदिवस वाट पाहण्याची गरज उरणार नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं आपल्या ८ कोटी सदस्यांसाठी 'EPFO 3.0' अॅपमध्ये हे महत्त्वाचं आणि नवीन अपग्रेड आणत आहे. या अंतर्गत एप्रिल २०२६ पर्यंत एक नवीन मोबाईल ॲप लाँच केलं जाईल, ज्याद्वारे सदस्य थेट UPI वापरून आपल्या खात्यातील पैसे काढू शकतात.
advertisement
पीएफ काढण्याची प्रक्रिया आता एखाद्या बँकेतून पैसे ट्रान्सफर करण्याइतकी सोपी होणार आहे. नव्या नियमांनुसार, सदस्य आपल्या युपीआय पिनचा वापर करून लिंक केलेल्या बँक खात्यात तात्काळ पैसे वळवू शकतील. आजारपण, लग्न, शिक्षण किंवा घराच्या कामासाठी लागणारा पैसा आता अवघ्या ३ दिवसांत विनासायास हाताशी येईल. विशेष म्हणजे, यासाठी कोणत्याही मानवी हस्तक्षेपाची गरज उरणार नाही.
advertisement
कसं असेल व्यवहाराचं गणित?
युपीआयद्वारे पैसे काढताना एका व्यवहारासाठी २५,००० रुपयांची मर्यादा असण्याची शक्यता आहे. निवृत्तीनंतरची सुरक्षा जपण्यासाठी तुमच्या एकूण बॅलन्सपैकी किमान २५% हिस्सा 'लॉक' राहील, तर उर्वरित मोठा हिस्सा तुम्ही गरजेनुसार काढू शकाल. लांबच लांब क्लेम प्रोसेसऐवजी आता थेट डिजिटल सेटलमेंटवर भर दिला जाईल.
ट्रायल सुरू, तांत्रिक अडथळे दूर करणार
श्रम आणि रोजगार मंत्रालयाने सध्या १०० डमी खात्यांवर याची चाचणी सुरू केली आहे. सिस्टीममध्ये कोणतेही तांत्रिक दोष राहू नयेत, यासाठी सरकार खबरदारी घेत आहे. सध्या ईपीएफओ वर्षाला ५ कोटींहून अधिक क्लेम सेटल करते, नव्या ॲपमुळे हा भार कमी होऊन सेवा अधिक वेगवान होईल. नवे ॲप आल्यावरही सध्याचे 'युनिफाइड मेंबर पोर्टल' आणि 'उमंग ॲप' पूर्वीप्रमाणेच इतर सेवांसाठी सुरू राहतील. मात्र, झटपट पैसे काढण्यासाठी नवे युपीआय आधारित ॲप हे मुख्य साधन ठरेल.
view comments
मराठी बातम्या/मनी/
नोकरदारांसाठी खूशखबर! या तारखेपासून UPI मधून झटपट काढता येणार पैसे
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement