advertisement

Summer Recipe : विदर्भ स्पेशल कळण्याच्या वड्या, एकदा बनवल्यानंतर टिकतील वर्षभर, सोपी रेसिपी

Last Updated:
मुगाच्या डाळीच्या भरडापासून तयार होणाऱ्या कळण्याच्या वड्या या विदर्भातील खास पारंपरिक चवीचे प्रतीक मानल्या जातात. या वड्यांची खासियत म्हणजे त्या एकदा बनवल्यानंतर वर्षभर साठवून ठेवता येतात.
1/7
उन्हाळा लागला की विदर्भात वाळवण्याच्या पारंपरिक पदार्थांची लगबग सुरू होते. या वाळवण्यांमध्ये सर्वात आधी बनवल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी वड्या हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. विशेषतः मुगाच्या डाळीच्या भरडापासून तयार होणाऱ्या कळण्याच्या वड्या या विदर्भातील खास पारंपरिक चवीचे प्रतीक मानल्या जातात. या वड्यांची खासियत म्हणजे त्या एकदा बनवल्यानंतर वर्षभर साठवून ठेवता येतात. त्यामुळे ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणावर या वड्या तयार करण्याची परंपरा टिकून आहे. इतकेच नव्हे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी नव्या वड्यांची भाजी बनवण्याची प्रथा विदर्भात विशेष मानली जाते.

2/7
कळण्याच्या वड्यांसाठी लागणारे साहित्य : मुगाच्या डाळीची भरड, हिरव्या मिरच्या, मेथी, लसूण, जिरे आणि मीठ हे साहित्य लागेल.

3/7
कळण्याच्या वड्यांची कृती : सुरुवातीला मुगाच्या डाळीची भरड 4 ते 5 तास पाण्यात भिजवून ठेवावी. त्यानंतर ती स्वच्छ धुऊन थोडीशी सुकू द्यावी. भरड अर्धवट सुकल्यानंतर पाट्यावर वाटण्यासाठी घ्यावी.

4/7
प्रथम हिरव्या मिरच्या, मेथी, लसूण आणि जिरे यांचे वाटण तयार करावे. त्यानंतर त्यात भिजवलेली भरड घालून एकत्र वाटावे.

5/7
तयार मिश्रणात चवीनुसार मीठ घालून ते नीट मिसळावे. यानंतर या मिश्रणाच्या लहान-लहान वड्या करून त्या सूप, पारडे किंवा स्वच्छ कापडावर मांडाव्यात.

6/7
वड्या 2 ते 3 दिवस उन्हात चांगल्या प्रकारे वाळवून घ्याव्यात. वड्या पूर्ण कोरड्या झाल्यावर त्या हवाबंद डब्यात साठवून ठेवाव्यात.

7/7
वर्षभर कधीही या वड्यांची चवदार भाजी बनवून जेवणात पारंपरिक चव अनुभवता येते. उन्हाळ्यातील ही पद्धत केवळ चव वाढवणारी नाही, तर दीर्घकाळ साठवणुकीसाठीही उपयुक्त ठरते. आजही विदर्भात ही परंपरा तितक्याच उत्साहाने जपली जात आहे.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement