गव्हांकुर रसाला का म्हणतात हिरवं रक्त? आरोग्यदायी रेसिपी बनवायची कशी?

Last Updated:
आयुर्वेदात आरोग्यदायी रस म्हणून गव्हांकुर रसाचे महत्त्व सांगितले आहे. गव्हांकुर रसाला हिरवे रक्त म्हणून देखील ओळखले जाते.
1/7
सध्याच्या धकाधकीच्या काळात आरोग्याबाबत प्रत्येक जण सजग झाला आहे. उत्तम आरोग्यासाठी पोषक आहार गरजेचा असतो. त्यामुळे आहाराबाबतही विशेष काळजी घेतली जाते. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे आणि पोषक पदार्थांचा समावेश केला जातो.

advertisement
2/7
 आयुर्वेदात आरोग्यदायी रस म्हणून गव्हांकुर रसाचे महत्त्व सांगितले आहे. गव्हांकुर रसाला हिरवे रक्त म्हणून देखील ओळखले जाते. हा गव्हांकुर रस बनवायचा कसा? आणि त्याचे आरोग्यासाठी महत्त्व काय आहे? याबाबत <a href="https://news18marathi.com/maharashtra/jalna/">जालना</a> येथील आहारतज्ज्ञ गीता कोल्हे यांनी माहिती दिलीय.

3/7
आपल्या आहारामध्ये रोज एक ग्लास गव्हांकुर रसाचा समावेश केल्यास आरोग्यास आश्चर्यकारक फायदे होतात. गव्हाच्या अंकुरापासून हा रस बनवला जातो. त्यासाठी कुंड्यांमध्ये माती टाकून त्यामध्ये आपल्या अंदाजाने गहू टाकावेत. त्यास पाणी द्यावे. आठ ते दहा दिवसांनी गव्हाचे चांगले अंकुर वरती येतात.

4/7
नवव्या किंवा दहाव्या दिवशी या गव्हांकुरापासून मिक्सरमधून काढून ज्यूस तयार करावा. त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालू शकता. एक कुंडी गव्हांकुरापासून एक ग्लास रस तयार होतो. आपल्याला दररोज रस हवा असल्यास दररोज एका कुंडीमध्ये हा प्रयोग करायचा. यामुळे दर आठ दिवसांनी आपल्याला गव्हांकरापासून रस तयार करता येईल.

5/7
गव्हांकुरचे आपल्या शरीराला खूप सारे फायदे आहेत. यामुळे ॲनिमिया, रक्ताची कमी असेल तर ती भरून निघते. विविध जीवनसत्वे गव्हांकुर रसामुळे आपल्याला मिळतात. त्वचारोग नाहीसे होतात. त्याचबरोबर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

6/7
रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढल्याने उत्साह वाढतो. त्याचबरोबर शरीर डिटॉक्स करून शरीरातील विजातीय घटक शरीराबाहेर पडतात. त्याचबरोबर वजन कमी करण्यास मदत होते. आपली त्वचा चमकदार होऊन त्वचेवरती ग्लो येतो. यामुळेच गव्हांकुर रसाला हिरवे रक्त म्हणतात, असे आहारतज्ज्ञ सांगतात.

7/7
दरम्यान, गव्हांकुर रसाचा आपल्या आहारात रोज समावेश लाभदायी ठरतो. त्यासाठी घरीच अशा प्रकारचा रस बनवता येतो. सदृढ आरोग्यासाठी गव्हांकुर रसाचे नियमित सेवन करावे, असेही आहारतज्ज्ञ कोल्हे सांगतात.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement